श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ जो उस्ताद तोच वस्ताद ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
?????
जंगलातील रोजच्या रुटीनला कंटाळून आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी सुरु झालेला ‘बिग टास्क’ हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला होता. आज या कार्यक्रमाचा विजेता (/ विजेती) ठरणार होता. विजेत्या स्पर्धकाला ‘जंगलं पर्व’ या व्हाटसप ग्रुप चे ऍडमीन पद द्यायची घोषणा ‘राजाने’ आधीच केली होती. या महा अंतिम फायनललाही खास परीक्षक आले होते
छोटा भीम – बेळगाव जवळील दांडेली अरण्यातून
मोगली – पुण्या जवळच्या अरण्येश्वर येथून
आणि चीन मधील एका जंगलातून खास डोरेमॅन आपल्या अद्भुत गॅजेटसह उपस्थिती होता.
मराठी इव्हेंट मधला कुठलाही शो हा
‘थूकरटवाडी’ जंगलातील प्राण्यांशिवाय संपन्न होऊच शकत नाही तेंव्हा निलू गाय आपल्या संपूर्ण टिम सह (भाऊ करकोचा, कुशल गेंडा, सागर मासा , श्रेया कोंबडी) सह हजर होता. उपस्थितांचे मनोरंजन करत होता.
जे या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत ते तुमच्या आमच्यासारखे ‘गाढव’ झुंडीने हा कार्यक्रम बोरिवलीच्या नॅशनल पार्क मधे लावलेल्या मोठ्या स्किनवर वर पहात होते. कात्रजच्या उद्यानात हा कार्यक्रम न दाखवल्याचा निषेध म्हणून पुणेकर गाढवांनी उद्या लोणावळ्याच्या भूशी जंगलात जिथे हा शो होतो तिथे निषेध मोर्चा न्यायचे ठरवले होते. आनायचे पावसाळी पिकनिक कुटुंबासह करता येईल असा विचार या हुषार गाढवांच्या डोक्यात होता हे वेगळे सांगायला नको
(जे यातलं काहीच करु शकत नव्हते ते हा टुकार लेख वाचत होते)
तर
शेवटच्या फेरी पर्यत
शिल्लक राहिलेले स्पर्धक होते पुष्कर – लांडगा , अस्ताद, -अस्वल (उर्फ वकील),
सई, – लांडोर , मेघा, – मेंढी , शर्मिष्ठा – वासरु , स्मिता – कोकिळा
सुरवातीला खास परिक्षकांनी वेगवेगळे टास्क देऊन स्पर्धकांना गोंधळात टाकले. यात कोकिळेला मलिष्काचे एक गाणे म्हणावयास सांगणे, लांडोरीला जंगलात तयार झालेल्या खड्ड्यात पाय न टाकता ‘मोर डान्स’ करायला सांगणे, अस्वलाला भक्ती गीत म्हणायला लावणे, लांडग्याला १ मिनिटात शंभर वेळा पक्ष बदलणे, इ इ. टास्क होते. सर्वांना हे करताना घाम फुटलस
त्यानंतर सर्व प्राण्यांचा लाडक्या ‘ रिंग मिनिस्टर ‘ नागेश ने उपस्थित राहून सर्वाना एक एक आदेश दिेला. हा कार्यक्रम ही रंगला आणी उपस्थितांनी
‘जय जंगलराज’ अशा घोषणा दिल्या.
शेवटी मुख्य गोष्ट स्पर्धकांना करावयाला सांगितली ती म्हणजे मतांसाठी ( SMS) भिक मागणे. कारण मिळालेली मते आणी परिक्षकांचे गुण यावरच विजेता ठरणार होता.
सुरवात कोकिळेने केली – मी जर ग्रुप अॅडमीन झाले तर ग्रुपवर येणारे पुणेकरांवरचे विनोंद बँन करीन. पुणेकर please.please. मत द्या ?
लांडगा – नो नियम. पुश करो( forward करो) खुष रहो. देतायना मला मत
अस्वल ( वकील) – A to z मेसेज टाका फक्त B ग्रेड नको. आणि नवीन नियमाचा बाऊ नको. मी स्वतः तुमच्या ग्रुप मधे आहे तो “भालू पोलिस” कसा येतो तेच बघतो. मला मत द्यायचे की नाही तुमचा प्रश्ण
वासरु- माझ्या सारखा आपला ग्रुप ही खेळकर राहिल. मलाच विजयी कराल ना?
लांडोर – तुम्ही माझा आत्तापर्यत चा प्रवास जाणता. आत्ता जो आपला ग्रुप आहे त्याला और ‘अच्छे दिन’ आणेन. विश्वास दर्शक मत नक्की द्या
मेंढी- काही पण भेंडी बोलून राहिले हे. पोकळ आश्वासन देतायत सगळे. मी काही नियम ठेवणार नाही आणी पाळणार नाही. श्रावण पण नाही. मला जर निवडून दिले ते माझ्याकडून सर्वाना गटारी पार्टी
तर शेपटी नसलेल्या प्राण्यांनो
.. हो हो तुम्हीच कुणाला देताय मत?
आणी निकाल काय लागलाय ?
लवकरच.
वाचत रहा..
माझे टुकार ई-चार
(* सर्व लेखन काल्पनिक, वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)
© श्री अमोल अनंत केळकर
२०/७/१८
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com