सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
घरांप्रमाणे आता कार्यालयातही भिंतीना असेच महत्त्वाचे स्थान आहे. नवीन पद्धतीप्रमाणे Corporate offices मध्ये कमी उंचीच्या फायबर ग्लासच्या पार्टिशन्स करतात, हेतु हा की प्रत्येक कर्मचा-याची काम करताना एकाग्रता साधणे, अलगपणा जपणे, त्याचबरोबर सहका-यांना मदतही करणे. या छोट्या उंचीच्या भिंतींचे विचार किती उच्च आहेत नाही?
चीनची भिंत पूर्वी पासून प्रसिद्ध. गेल्या शतकापासून या भिंतीला फक्त लांबीचे महत्त्व उरले आहे. कारण जगाने चीनकडे किंवा चीनने जगाकडे ही भिंत ओलांडून संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याची उपयुक्तता आणि परिणाम किंवा सौहार्द की विनाश, हा विषय वेगळा!
पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी मधली भिंत पडली. पण ती पडल्यानंतर खरंच पूर्व-पश्चिम जर्मनी तले अंतर कमी झाले व संबंध चांगले झाले.
शाळेच्या भिंतींची प्रत्येक वीट, प्रत्येक चिरा वंदनीय असतात. भिंतीवरचे बाराखडीचे, अक्षरांचे, शब्दांचे, अंकांचे, पाढ्यांचे तक्ते, सुविचारांनी रंगलेल्या भिंती कोणीच विसरणार नाही. वर्गात आता भिंतीवर फळ्याबरोबर digital screens ही असतात. मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन छोटुल्याला मोठा करणा-या शाळेच्या भिंतीं…..
क्रमशः…
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈