श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
“कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा?”
या शेवटच्या वाक्यात ‘बाहुबली भाग- २ ची बीजे रोवली होती आणी भाग- २ येणार हे नक्की होते.
*”भाई” वरचा लेख व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यावर* टुकार लेखकाचे कौतुक करायला अनेकजण पुढे आले. टुकार लेखकाच्या लक्षात आले की भाई- भाग २ ची बीजे पहिल्या लेखात आहेतच की, मग काय .
लिहायचे निमित्य बाकी काही नाही. (नाहीतर लिहायची हिंम्मत तरी झाली असती का? , आता या टुकार लेखकाला कसे समजवायचे की भाग- १ चीच हवा जास्त होते. २,३ वगैरे कामाचे नसतात. असो ).
तर पहिल्या भागात, भाईं सुनिताबाईंना सांगत होते की बरं झालं अत्रे ढाराढूर झोपले होते नाहीतर सकाळी आपल्याला विडंबन रुपी गाण्याचा ‘झेंडूच्या फुलांचा’ हार मिळाला असता.
मंडळी, अत्रे अजिबात झोपले नव्हते बरं का. त्या दोघांचे बोलणे आचार्यनी सगळे ऐकले. भाई आणि सुनिताबाईं पुण्याला गेल्यावर “फाॅर अ चेंज” अत्रे भाईंच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी झेंडूच्या फुलांचा हार विणायला घेतला.
चाल: बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला)
भाई भाई, व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ….
चिमणा गटणे, साहेब रावा
चिमण्या थेटरात, “म्हैस” थांबवा
चिमणी पोर , घेऊन गाडी
हेल्मेट घालते, आपल्या नव-याला
चिमणं चिमणं “सिंबा” थांबवलं ,त्याही थेटरला
भाई भाई, व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..
शिलेदार ‘महाराष्ट्र भूषण’ माझा, थोर असा साहित्याचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या कलेला .
‘आहे मनोहर तरी’ पसारा, खेळ पाहुनी जीव रंगला
गोजिरवाणी जुगलबंदी, वाजवितो भाई पेटी गाण्याला
येडं यडं मन येडं झालं पाहून “भाईला”
भाई भाई, व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..
आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावर क्र-१ वरुन सुटणा-या “दख्खनच्या राणीने” आपल्या नियोजीत वेळेत एक शिट्टी जोरात मारून मुंबई कडे झेप घेतली. आज तिला माहित होते की गाडीत अख्या मराठी सृजनांचे लाडके “भाई आणि सुनिता बाई ” विराजमान आहेत. तळेगावत ते लोणावळा धुकं जास्त असल्याने राणीला मुंबईला पोहोचायला थोडा उशीरच झाला पण मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर ‘धावपट्टीच्या’ कामासाठी मेगा-ब्लाॅग घेतल्याने भाईंचे पुष्पक थोडे उशिराच सुटणार होतं त्यामुळे काळजीचे काम नव्हतं.
इकडे आचार्य झेंडूच्या फुलांचा हार हातात घेऊन स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर दोघांच्या स्वागतासाठी ‘ भाई’ अजून कसे आले नाहीत म्हणून येरझा-या घालत आहेत.
*पु. ल देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्य, लाडक्या भाईंना टुकार लेखकाकडून ही लेखनांजली समर्पित* ?
© श्री अमोल अनंत केळकर
५/१/१९
शनी अमावस्या
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com