सुश्री संगीता कुलकर्णी
☆ विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
रिचार्ज व्हायचा आपापला एक फंडा असतो. कोणाचं गाणी ऐकून मन रिफ्रेश होतं तर कोणाचं चित्रपट बघून. पण माझे मन मात्रं हातात लेखणी आली की रिफ्रेश व्हायला लागते.
माझी प्रत्येक रचना मग ती कथा असो कविता असो चारोळ्या असो अगदी आध्यात्मिकावरही लेख कविता असो ती माझ्या पेक्षा वेगळीच असू शकत नाही. मी जे लिहिते किंवा लिहिण्यासाठीजे शब्द निवडते..खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असते.
रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ लिखाण मला प्रेरणा देतात तर शब्द ऊर्जा आनंद..बोलायलाही खूप आवडतं आणि बोलतेही..अगदी पुस्तकांवरही ….
मनांचा मनाशी संवाद… प्रश्न माझेच आणि उत्तरेही माझीच…. ना तिथे हेवेदावे ना मतभेद.. फक्त समाधान
अतिव आनंद…मग मी म्हटलं संवादांना,क्षणांना,आठवणींना ,अनुभवांना ..तुम्हाला मनात का कैद करू?
म्हणून मी कागदाशी मैत्री केली आणि त्या सर्वांना मी कागदावर उतरवतं गेले व्यक्त होत गेले. आजूबाजूला घडणारया प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून त्याचेही अनुभव मी अगदी त्रयस्थ पणे मांडत गेली आणि अजूनही मांडत आहे… सूर्य ,चंद्र, पाऊस यांच्याशी सुद्धा माझी सलगी झाली आणि वेगळ्याच दृष्टीने जग कळू लागले.
शांततेपासून ते व्यक्त होण्याचा आणि अस्तित्वापासून ते परिपूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास…या प्रवासाने मला व्यक्त होता आले आणि मी लिखाणातून व्यक्त झालेही..आणि मी अजूनही व्यक्त होत आहे..
माझ्यातल्या मला शोधायला आवडतं आणि हो व्यक्त होऊन लिहायलाही आवडतं…
खरचं लेखणीचं एक वेगळंच विश्व असतं नाही का? व्यक्त व्हायला..
सोबत असतात कोरा कागद,पेन आणि भावना….
© सुश्री संगीता कुलकर्णी
ठाणे
9870451020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈