मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ मी_माझी – #23 – ☆ फुलं… ☆ – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी  फुलं… .  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं।  पुष्पों का हमारे जीवन के विभिन्न अवसरों पर सकारात्मक सम्बन्ध हैं. सुश्री आरुशी जी की कविता सहज ही हमें जीवन के प्रातः से संध्या तक घर आंगन से लेकर हमारे ह्रदय विभिन्न भावों में  फूलों की सुगंध का अहसास देती है.  सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #23 ☆

 

☆ फुलं… ☆

 

फुलांना आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे…
आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर ह्यांची साथ मिळत असते, आणि गंमत म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला त्याची जाणीवही नसते… गृहीत धरतो की फुलं आहेतच, त्यात वेगळं ते काय… हे जरी असाल तरी फुलं मात्र त्यांचं काम चोखपणे बजावत असतात… उमलण्यातील आनंदाने परिसर गंधित, सुगंधित करतात… सगळ्यांना एकत्र ठेवलं तरी स्वतःचे वेगळेपण असनाती ही फुलं, सकारात्मकतेच रूप आहे असं म्हणायला हवं…

विघनहर्त्याची पट्ट जास्वंद,
लाल चुटुक कुंकवाला आवाहन देणारी,
तर कमळ पवित्रता देऊन जाणारे,
शुभ्रतेतून, पावित्र्य जपणारा अनंत, सोनटक्का, तगर,
आसमंत कायमच सुवासिक करणारे…

श्रुंगारतेला लेऊन फुलणारा मोगरा,
चंद्र चांदण्यांसोबत आसमंत धुंद करणारी रातराणी,
कमसीन हो,नादान हो, नाजूक हो, भोली हो,
अशी ती जाई जुईची मोहकता…

गुलाबी प्रेमाची सुरुवात करणारा गुलाब असला तरी,
प्रेमातील वेडेपणा म्हणजे निशिगंध,
अलवार अबोली मौनातून जवळ जाणारी,
मादकतेची उधळण करणारा सोनचाफा,
सोबतीला साज चढवणारी शेवंती,
तरी हवाहवासा , नाकारता न येणारा चाफा…

समर्पणातील आनंद घेणारा प्राजक्त,
तर नात्यांतील वीण घट्ट करणारी बुचाची फुलं,
उत्साहाने डोलणारी लिलीची फुलं,
अंगणाची शोभा वाढवतात…

 

© आरुशी दाते, पुणे