श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता झुळूक )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #26☆
☆ झुळूक ☆
नभ दाटूनीया येता
मज तूच आठवते
आठवणी स्मरताना
मन पुन्हा हेलावते. . . . !
शहारतो बोलताना
जातो कबुली देऊन
आहे प्रेम तुझ्यावर
शब्द जाती ओठातून. . . . !
ऐकताच बोल माझे
येतो पाऊस ही गाली
थेंब थेंब पावसाचे
गाती प्रेमाचीच गाणी. . . . !
झुळुकही गंधाळते
वाट पाहे उत्तराची
मौनांतून कळे सारे
वेळ होते परतीची. . . . !
असा चाले मनामध्ये
पाठ शिवणीचा खेळ
तुझ्या माझ्या गं मेघांचा
कधी जमणार मेळ ?
© सुजित कदम, पुणे
7276282626