मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामायिक भावप्रवण कविता “आपण सोबती”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 45 ☆
☆ आपण सोबती☆
मूर्ख नाही आम्ही कसे लावणार दिवे
शतकोटी मूर्ख येथे साधतील दुवे
चार शहाणे बोलती येथे रोखठोक
घेती स्वतःचेच स्वतः ठेचून हे नाक
चंद्र नभातून पाही धर्तीचे अंगण
नऊ मिनिटांत उभे केले तारांगण
काय लावतात येथे लोक हे तर्कट
काही मशाली घेऊन निघाले मर्कट
कुठे पहातो कोरोना धर्म आणि जात
मुस्लिमाचे शव जळे हिंदू स्मशानात
उगा उन्मादाने देह करू नका माती
जगी हजारो देहाच्या विझल्यात वाती
काळ निघून जाईल काळाच्या सांगाती
काल होतो तसे राहू आपण सोबती
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८