सुजित शिवाजी कदम
(सुजित शिवाजी कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक भावप्रवण कविता “ओल. . . . !”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #47 ☆
☆ पत्रलेखन – ओल. . . . !☆
प्रेम गुलाबाचे फूल
तुझ्या गाली फुललेले
एका एका पाकळीत
आठवांनी नाहलेले. . . !
प्रेम कवितेचे घर
सुख दुःखाचे माहेर
कधी आसू, कधी हासू
देई ओठांनी आहेर. . . . !
प्रेम सागराची गाज
त्याला किनारी आसरा
नको नदी आसवांची
हवा चेहरा हासरा . . . . !
प्रेम गुलाबाचा काटा
काढी काट्यानेच काटा
तुझ्या डोळ्यात फुलल्या
जीवनाच्या ओल्या वाटा. . . . !
दव बिंदू पुरे एक
घेतो टिपूनीया प्रेम
ओल काळजाची माझ्या
माझ्या शब्दात सप्रेम. . . . . !
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
7/2/2019.