श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत मार्मिक, ह्रदयस्पर्शी एवं भावप्रवण कविता “ईश्वरी प्रकाश”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 51 ☆
☆ ईश्वरी प्रकाश☆
हातात काहीच नसताना
कवितेच्या अंगणात
शब्दांची रांगोळी काढण्याची कला
ईश्वराने मला बहाल केली…
एवढेच नव्हे तर
त्या रांगोळीची छबी
कायम स्मरणात राहावी म्हणून
मेंदूच्या कॕमेऱ्यात ती टिपण्याची
क्षमताही दिली…
काल सहस्तचंद्र दर्शन सोहळ्यात
काढलेली रांगोळी
पुसून टाकलेली पाहिली
आणि मला
मी शब्दांच्या काढलेल्या रांगोळ्याची
आठवण झाली…
त्या रांगोळ्यांचे रंगही
आता पुसट होत चालले आहेत
डोळ्यांवरचा पडदा सरकतो आहे
डोळ्यांच्या बाहुल्या झाकण्यासाठी
आणि मी पापण्या ताणून पहातोय
अंधाराच्या पलिकडचा तो
ईश्वरी प्रकाश…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८