सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 67 ☆
☆ गझल – वृत्त – पीनाकी ☆
(लगागागा लगागागा लगागागा लगागा)
अता वाटे खरेतर हे जगा माहीत होते
कशाला मी उगाचच लपविले का भीत होते
असावे पूर्वजन्मीचे ऋणादीबंध काही
जसे राधा मुरारीही जुने मनमीत होते
गझल अद्यापही ज्यांची मना वेढून आहे
कळाले नाव ते चित्रा सहित जगजीत होते
मला आल्या पुन्हा हाका दिशा दाही उजळल्या
तुला सांगू कसे हे काय धुंडाळीत होते
अशी आहे नशा जगण्यात गझलेचीच सारी
थवे आजन्म शब्दांचेच कुरवाळीत होते
फुले वाट्यास आलेली जरी बेरंग होती
तरीही क्षण सुखाचे पूर्ण गंधाळीत होते
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अतिसुन्दर रचना
धन्यवाद सर
????
धन्यवाद सर