श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #50 ☆
☆ सण…! ☆
सण प्रेमाचा सोहळा
सण प्रेमाचा ओलावा
सण सुखांची आरास
सण मांगल्याचं गाणं…!
सण विचारांचे कोंदण
सण परंपरेचे आंदण
सण साखरेचा गोडवा
सण आप्तांचा सोहळा….!
सण प्रकाशाची वाट
सण आनंदी पहाट
सण सुगंधी उधळण
सण सर्वांची आठवण….!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६