श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 75 ☆ टेन्शन काय यायचं ? ☆
समोर येईल ते खायचं
आणि गप्प राहायचं
वय झालं वेड्या तुझं
टेन्शन काय घ्यायचं ?
संसाराच्या डबक्यात
नाही तू बुडायचं
लग्न असो बारसं असो
गप्प बसून राहायचं
लक्ष देतो तुझ्याकडं
कोण इथं फारसं
कष्टानं घेतलेल्या
कौतुक नको कारचं
धोतर झालं जुनं आता
विरळ ते व्हायचं
उलटून गेली साठी आता
गाठी मारत जायचं
घरी नको अडचण
देवळात बसायचं
एकच काम तुला आता
रामनाम घ्यायचं
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈