सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 76 ☆
☆ वृत्त- वंशमणी ☆
कशास आले, कुठून आले कोठे
वादळ दाटे अंतरात या मोठे
या जगण्याला अर्थ न उरला आता
कुणी न वाली,कुणी न माझा त्राता
मी एकाकी मूक पाखरू आहे
झाडाखाली ,तरी उन्हाळा साहे
घाव जिव्हारी पुन्हा पुन्हा हे ताजे
कसे सावरू आयुष्याचे ओझे
मी मरणाला नित्य मारते हाका
अन जगण्याचा पुन्हा बदलते ठेका
मी शापित की कुणी कलंकित आहे
गतजन्मीचा स्रोत इथूनच वाहे
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुरेख….!?
धन्यवाद अरूणजी