श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 61 – मी एक ☆
मी एक
असे आईची आस
बाबांचा श्वास
अंतरीचा
मी एक
ताई म्हणे परी
दादाच्या अंतरी
बाहुलीच
मी एक
करी प्रयत्न खास
प्रगतीचा ध्यास
अविरत
मी एक
राणी आहे सजनाची
माझ्या मनमोहनाची
अखंडीत
मी एक
बनली कान्हाची मैय्या
जीवन नैय्या
सानुल्याची
मी एक
जरी हातात छडी
मनात गोडी
विद्यार्थ्यांची
मी एक
सदा भासते रागीट
प्रेमही अवीट
सर्वांसाठी
मी एक
कशी सांगू बाई
सर्वांची माई
योगायोग
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈