श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 98 ☆
☆ भारतमाते ☆
भारतमाते तुला वाहिले
सारे माणिक मोती
नका रे विसरू आपली माती
मिळूनच सारे लढले होते
विसरून धर्म अन् जाती
फासावरती हसत चढले
किती विझल्या प्राणांच्या ज्योती
माता म्हणूनी पुजे धरणीला
या जगतात आमची ख्याती
तिन्ही बाजूने सागर डोलतो
अन् गंगा यमुना वहाती
शुभ्र असा हा उंच हिमालय
त्याच्या समान आमची नीति
सौंदर्याचीच हे खाण काश्मीर
निसर्गाशीच जुळती नाती
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈