1

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 102 ☆ प्रार्थना ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

🦋 साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 102 🦋

☆ प्रार्थना ☆

येवो प्रचंड शक्ती या प्रार्थनेत माझ्या

कोमेजल्या फुलांना  चैतन्य दे विधात्या

 

आयुष्य लागले हे आता इथे पणाला

हे ईश्वरा सख्या ये प्राणास वाचवाया

 

अगतिक नको करू रे तू धाव पाव नाथा

साई तुझ्या कृपेची आम्हा मिळोच छाया

 

लागो तुझ्याच मार्गी ओढाळ चित्त रामा

सारी तुझीच बाळे सर्वांस रक्षि राया

 

हे बंध ना तुटावे सांभाळ या जिवांना

देवा तुझ्याच हाती प्रारब्ध सावरायला

 

सा-या जगाच साठी मागेन दान दाता

आता पुन्हा नव्याने बहरोत सर्व बागा

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈