श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 75 – हा मार्ग संकटांचा ☆
हा मार्ग संकटांचा, अंधार दाटलेला।
शोधू कसा निवारा, जगी दंभ दाटलेला।धृ।।
हे मोहपाश सारे, अन् बंध भावानांचे।
मी दाखवू कुणाला, आभास वेदनांचे।
प्रेमात ही आताशा , हा स्वार्थ साठलेला।।१।।
लाखोत लागे बोली,व्यापार दो जिवांचा।
हुंड्या पुढे अडावा, घोडा तो भावनांचा ।
आवाज प्रेमिकांचा, नात्यात गोठलेला।।२।।
ही लागता चाहूल , अंकूर बालिकेचा।
सासूच भासते का , अवतार कालिकेचा।
खुडण्यास कळीला , हा बाप पेटलेला।।३।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈