श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 76 – आई अंबाबाई ☆
अगं आई ,अंबाबाई
तुझा घालीन गोंधळ ।
डफ तुण तुण्यासवे
भक्त वाजवी संबळ।
सडा कुंकवाचा घालू
नित्य आईच्या मंदिरी।
धूप दीप कापूराचा
गंध दाटला अंबरी.
ताट भोगीचे सजले
केळी, मध साखरेने।
दही मोरव्याचा मान
फोडी लिंबाच्या कडेने .
ओटी लिंबू नारळाची-
संगे शालू बुट्टेदार।
केली अलंकार पूजा
सवे शेवंतीचा हार.
धावा ऐकुनिया माझा
आई संकटी धावली।
निज सौख्य देऊनिया
धरी कृपेची सावली।
माळ कवड्यांची सांगे
मोल माझ्या जीवनाचे।
परडीत मागते मी
तुज दान कुंकवाचे।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈