श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ माफ कर ☆
जीवनाच्या गाडीला
रिवर्स गियर असता तर
आलो असतो माघारी
जोडलं असतं पुन्हा घर
गेलोय आता खूप पुढं
म्हणतो तुला माफ कर
घड्याळाचा काटा हा
उलटा फिरला असता तर
गाठलं असतं तारुण्य
बोललो असतो प्रेमावर
चूक माझी झाली थोडी
प्रिये मला माफ कर
पश्चिम माथ्यावरचा सूर्य
पूर्वेकडे आला तर
पुन्हा दोघे भेटलो असतो
प्रेमात पडली असती भर
सूर्य आहे हट्टी फार
निघून गेलाय दूरवर
त्याचीच होईल सात जन्म
मागितला होतास वर
नाही भेटलीस याही जन्मी
मला म्हणालीस माफ कर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर भावपूर्ण रचना बधाई