श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “सूर्य वेगळा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 17☆
☆ सूर्य वेगळा ☆
गुलाल रविचा अंगाला या बाधत नाही
हा देहाला फक्त सुखवतो माखत नाही
तहानलेला भास्कर करतो समुद्र प्राशन
सागरातले क्षार तरीही चाखत नाही
नऊ ग्रहांचे चक्र जरी हे तुझ्या भोवती
तसा कुणाच्या हाताला तू लागत नाही
तू जागेवर रथ किरणांचे धावतात हे
वेगवान हे अश्व कुठेही थांबत नाही
रोज पहाटे ऊन कोवळे घेतो आम्ही
उर्जा मिळते किरण कोवळे भाजत नाही
जेव्हा जेव्हा तुला पाहतो प्रसन्न तू तर
कधी उदासी तुझ्या मुखावर भासत नाही
किती धर्म अन् कितीतरी या जाती येथे
कुणाच सोबत सूर्य वेगळा वागत नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८