स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली ☆ कवी…कुसुमाग्रज ☆
मी आहे
शब्दलंपट-
शब्दांच्या वारांगना
सज्ज्यावर उभ्या राहून
खुणावतात मला,
कोठल्यातरी दाहक रसायनात
वितळतात सारे प्रतिकार
आणि मी जातो ते बहिष्कृत दरवाजे लोटून
सरळ आत
अर्थाचा हिशेब न करता
– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈