सौ .योगिता किरण पाखले
(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी एक सामयिक एवं समाजकंटकों के प्रति युद्ध के उद्घोष तथा नारी सशक्तिकरण पर मानसिक द्वंद्व से उपजी कविता “लढाई”। हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)
☆ लढाई ☆
हृदय हेलावणारी
दिशादिशात घुमणारी
ती आर्त किंकाळी
अनंतात विलीन झाली
नराधमांची भूक भागता
सारे काही स्तब्ध….
एक निरव भयाण शांतता
नव्यानं येणार वादळ शांत करण्यासाठी….
बस ……..
आता बस…..
उठ निर्भया ,उठ..
यदा यदा हि धर्मस्य
नकोच आठवू
नाही येणार तो कृष्ण
घट्ट कर ती साडी निर्भयतेची ……
अन हो सारथी तू तुझ्याच रथाची…
धृतराष्ट्र बसलेत सारे
दु:शासनाचा पराक्रम पाहण्यासाठी….
सांग एकदा त्यांना,
तुझ्या जीवाची किंमत फक्त नाही फाशीचा दोर
अजूनही लपलेत येथे काही सावज अन चोर
नवीन निर्भया चिरडण्यासाठी…..
आता तरी पेटू दे गं
तुझ्यातील अंगार
जातांना देऊन गेलीय निर्भया
एक चिंगार…..
भडकू दे वणवा, भस्मसात कर सारे दु:शासन
कशाला हवे न्यायव्यवस्थेचे शासन….
एका निकालाने वासनांधांची भूक नाही शमनार इतक्यात
म्हणूनच …….उठ
लढाई अजून संपलेली नाही
कारण तू अजून जिंकलेली नाही
तू अजून जिकलेली नाही….
© सौ. योगिता किरण पाखले, पुणे
मोबा 9225794658