श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनकी ज्ञानवर्धक कविता कमलपुष्पौषधी चारोळ्या . श्रीमती उर्मिला जी के अनुसार यह पूजनीय बहिणाबाई चौधरीके अष्टाक्षरी छंदमे लिखी हुयी है !’अरे संसार संसार ‘ की तरह इसे गा भी सकते हैं.)
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 5 ☆
☆ कमलपुष्पौषधी चारोळ्या ☆
अरे गणेशा गणेशा
तुला कमळ आवडे
कमळाच्या भागांमध्ये
खूप औषधी सापडे !!१!!
कमळाच्या फुलांमध्ये
शक्ती असे खूप मोठी
रस कमळ फुलांचा
ताप कमी होण्यासाठी !!२!!
दले कमलपुष्पांची
अंथरुनी वस्त्रावरी
ताप जाईल निघुनी
रुग्णा निजवावे वरी !!३!!
फुले कमलाक्ष भारी
स्त्रीयांच्या रोगावरही
फुले मधात वाटून
पावडर करुनही !!४!!
महाराष्ट्र कोकणात
बहु कमळे फुलती
परि लाही कधी नाही
पहावयास मिळे ती!!५!!
गुळगुळीत बियांच्या
लाह्या सुंदर बनती
बहु औषधी असती
त्यांना मखाना म्हणती!!६!!
रुग्ण तापतात तेव्हा
पीठ लाह्याचे द्या आधी
त्यास पाण्यातून देता
किती स्वस्त हो औषधी !!७!!
अहो कमळांचे कंद
त्यांत सत्वे ती पौष्टिक
ज्यांना मिळे त्यांच्या गावी
त्यांनी खावी आवश्यक!!८!!
घेता चुकीचा आहार
वाढलेला तणावही
त्याचा उपयोग होई
घेता कमलपाकही !!९!!
कमलपाक औषध
आहे कमलपुष्पांचा
वैद्य मार्गदर्शनाने
होई उपयोग त्याचा !!१०!!
उष्णतेचा होई त्रास
ढाब्यावरचे आचारी
कमलपाक तयांना
औषधच लयी भारी !!११!!
वनस्पती देवादिका
ज्या सर्व आवडताती
औषधांचे गुणधर्म
त्यात ठासून असती !!१२!!
वाढ गर्भाची ती होण्या
पीठ लाह्यांचे वापरा
उपयोगी पित्तावर
आधी वैद्यांना विचारा !!१३!!
अरविंदासव छान
छोट्या टाॅनिक मुलांचे
‘भैषज्यरत्नावली’ त
असे उल्लेख तयांचे !!१४!!
अहो कमळ कांडी ती
योग तयात आहेत
छान वापर तयाचा
तुम्ही करा हो त्वरित !!१५!!
सौजन्य:– गुगल तसेच, फेसबुकवरील लेख डॉ. विलास ज. शिंदे.
आयुर्वेदाचार्य, खालापूर रायगड.
©®उर्मिला इंगळे
अनंत चतुर्दशी
दिनांक:-१२-९-१९
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!