सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ वाचकांचे अभिप्राय ☆
अभिप्राय – 1
मा. श्रीमती उज्ज्वलाताई,
संपादक (ई-अभिव्यक्ती – मराठी)
नमस्कार ,
‘ई-अभिव्यक्ती मराठी आवृत्तीचे’ मनापासून स्वागत.
आजच्या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून वाचक आणि लेखक या दोघांनाही आपण एक नवे दालन उपलब्ध करुन दिलंत! वाचन व लेखन यासाठी आपण हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे . तोही मराठी भाषेसाठी असल्यामुळे अभिमानास्पद आहे. छोट्या छोट्या लेखांच्या,गोष्टींच्या तसेच कवितेंच्या रुपातून ई- अभिव्यक्ती मार्फत हे साहित्य सहजपणे अनेकांच्या हातात पोचत आहे. जाता येता; कमी वेळात; कोठेही; सहजपणे वाचता येते. लॉकडाऊनमुळे वाचनालये बंद पडली आहेत. ई-अभिव्यक्ती वाचकांची तहान भागवण्याचे मोठं काम पार पाडत आहे. नवनवीन साहित्यकृती वाचायला मिळत आहेत. एक लेखिका म्हणून मला नवं आधुनिक व्यासपीठ मिळालं आहेच. पण एक वाचक म्हणून मिळणारा आनंद सुद्धा मोठा आहे.
अतिशय नेटकेपणाने, काही ओळीतून मांडलेली अभिव्यक्ती ‘थोडक्यात समजणे। थोडक्यात समजावणे। मुद्देसुद बोलणे। ही संवाद कला या संत तुकारामांच्या ओवीची आठवण करुन देते.
धन्यवाद ,
सौ. दीपा पुजारी, इचलकरंजी
अभिप्राय – 2
मी लिहीत असलेले माझे विचार ह्या माध्यमा मुळे लोकांपर्यंत पोचत आहेत, ह्याचा मला आनंद वाटतो. आमच्या सारख्या नवोदित लिहिणार्या साठी ही खूप मोठी संधी आहे जी आम्हाला केळकर काकू आणि पंडित सरांनी उपलब्ध करून दिली आहे.
या माध्यमातून मला ही अनेकांचे विचार कळण्यास मदत होते. मला सौ उज्ज्वला केळकर यांच्या मुळे ही संधी मिळाली.
त्यांना माझे मनापासून आभार.
सौ श्रेया सुनील दिवेकर
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈