सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ वाचकांचे अभिप्राय ☆
अभिप्राय – 1
काही दिवसांपूर्वी उज्वला मावशींनी (ज्येष्ठ लेखिका उज्वला केळकर) यांनी मला इ – अभिव्यक्ती च्या काही लिंक शेअर केल्या. शिवाय मलाही त्यासाठी काहीतरी लिहायला सांगितले. त्यामुळे त्या निमित्ताने मी ते साहित्य वाचायला सुरुवात केली.
वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळे लेखक- लेखिका खरोखरच अतिशय उत्तम व्यक्त झाले आहेत. यातील काहीजण पूर्वीपासूनच या क्षेत्रातील दिग्गज आहेत , तर काही नवोदित आहेत. पण तरीही सर्वांचे लेखन हे वाचताना खूपच मजा येते. आपण अनेक अनुभवांनी समृद्ध झाल्यासारखे वाटते. संपादक मंडळ चोखंदळ असल्यामुळे बऱ्याच उत्तम कलाकृती सहज वाचनासाठी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार!
डॉ. मेधा फणसळकर
अभिप्राय – 2
अंकाचे स्वरूप परिपूर्ण वाटते.बहुतेक सर्व साहित्यप्रकारांचा समावेश त्यात आहे. (शब्दमर्यादेमुळे नाटक/एकांकिका वगळता ).मुख्य म्हणजे निसर्गाजवळ नेणारे लेख वाचून मन प्रसन्न होतं. लेखकाचे फोटो व माहिती जोडल्यामुळे त्यांची व्यक्तिगत ओळख झाल्यासारखं वाटतं. थोडक्यात, अंक खूप आवडला.
सौ. गौरी सुभाष गाडेकर
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈