सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
✒️सौ.सुरेखा सुरेश कुलकर्णी – अभिनंदन ✒️
संपादकीय निवेदन
मराठी साहित्य मंडळ आयोजित आठवे साहित्य संमेलन कोरेगाव (सातारा) येथे रविवार दिनांक. २४\११\२०२४ रोजी संपन्न झाले. यात प्रतिष्ठेचा राज्य स्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार सातारा येथील सौ.सुरेखा सुरेश कुलकर्णी यांच्या ‘गुंफण शब्दांची नात्याची’ या पहिल्या काव्य संग्रहाला देण्यात आला.
💐 सौ. सुरेखा कुलकर्णी यांचे ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈