ई-अभिव्यक्ती (मराठी) – दिवाळी अंक
🕯 संपादकीय निवेदन 🕯
दारात रांगोळी, पहाटेच्या आंघोळी
अक्षरांची मांदियाळी, अशी असते दिवाळी
मराठी माणसाच्या मनात दिवाळीची चाहूल लागते ती फराळाच्या वासाने आणि दिवाळी अंकांच्या चर्चेने !
दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचे प्रतिकच आहे. दिवाळी अंकात साहित्य प्रकाशित होणे हे प्रत्येक साहित्यिकाचे स्वप्न असते आणि चोखंदळ रसिक वाचकही दिवाळी अंकांची आतुरतेने वाट पहात असतात. असाच एक दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ई-अभिव्यक्ती (मराठी) ने ठरवले आहे. साहित्यिकांनी आपली स्वतःची अप्रकाशित साहित्यकृती आमचेकडे पाठवून हा अक्षरसोहळा संपन्न करावा यासाठी हे आवाहन :
साहित्य पाठवताना खालील नियम विचारात घ्यावेत:
- दिवाळी अंक पीडीएफ किंवा ई बुक पद्धतीने काढण्यात येईल.
- प्रत्येक साहित्यिकाला कोणत्याही एका साहित्य प्रकारातील एकच रचना पाठवता येईल.
- अंकात कथा, ललित लेख, कविता, कविता रसग्रहण, चित्रकाव्य आणि पुस्तक परिचय या साहित्य प्रकारांसाठी साहित्य स्विकारले जाईल.
- कविता जास्तीत जास्त 20 ओळींची व चित्रकाव्य जास्तीत जास्त 12 ओळींचे असावे. अन्य सर्व साहित्य प्रकारातील लेखन जास्तीत जास्त 1500 शब्दांपर्यंत असावे. सर्व साहित्य व्हाट्सएप्प किंवा मेल ने वर्ड्स फॉर्मेट मध्ये पाठवावे.
- चित्रकाव्य साठी संपादक मंडळाकडून दोन चित्रे दिली जातील. त्यावर आधारितच काव्य असावे.
- साहित्य स्वतःचे व अप्रकाशित असावे. तसेच साहित्य दिवाळी अंकासाठी पाठवत आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.
- साहित्य निवडीचे सर्व अधिकार संपादक मंडळाकडे असतील.
- तांत्रिक कारणामुळे दिवाळी अंकात समाविष्ट न झालेले दर्जेदार साहित्य ई अभिव्यक्ती च्या दैनंदिन अंकात घेतले जाईल.
- आपले साहित्य दि.15 ऑगस्ट 2022ला संध्याकाळी सात पर्यंत आमचेकडे पोहोचेल अशा बेताने पाठवावे.त्यानंतर आलेल्या साहित्याचा दिवाळी अंकासाठी विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी .
- ही सेवा निःशुल्क आहे. साहित्यिकास मानधन दिले जाणार नाही.
- आपले साहित्य हे धार्मिक, राजकीय किंवा अन्य कोणत्याही विवादास्पद विषयापासून अलिप्त असावे. सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
- साहित्य पाठवताना खालील व्यवस्था विचारात घेऊन त्यानुसारच साहित्य पाठवावे
- कथा, पुस्तक परिचय सौ. उज्ज्वला केळकर यांचेकडे पाठवावे. संपर्क: 9403310170 किंवा [email protected]
- ललित लेख सौ. मंजुषा मुळे यांचेकडे पाठवावे. संपर्कः 9822846762 किंवा [email protected]
- कविता, रसग्रहण, चित्रकाव्यः सुहास पंडित यांचेकडे पाठवावे. संपर्क: 9421225491 किंवा [email protected]
सदर निवेदन आपण माहितीसाठी अन्य साहित्यिकांना व समुहांना पाठवू शकता.
चला, सर्वांच्या सहकार्याने, दर्जेदार साहित्य निर्मिती करून दिपावलीचा आनंद द्विगुणीत करूया.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈