सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
🙏 ✒️महत्वाचे निवेदन✒️ 🙏
ई-अभिव्यक्ती (मराठी) साठी साहित्य पाठविण्याविषयी निवेदन:-
गेली दोन वर्षे आपण अभिव्यक्तीसाठी साहित्य पाठवताना खालील प्रमाणे व्यवस्था केली आहे.
1. श्री.सुहास रघुनाथ पंडित यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.
कवितेचा उत्सव, काव्यानंद, क्षण सृजनाचे, प्रतिमेच्या पलीकडले, विविधा (ललित लेख).
संपर्कासाठी: व्हाॅटस् ॲप नं. 9421225491 किंवा [email protected]
2 सौ. उज्वला केळकर यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.
जीवनरंग (कथा), आत्मसाक्षात्कार, पुस्तकावर बोलू काही व नवीन सुरू होणारी सदरे.
संपर्कासाठी: व्हाॅटस् अॅप नं. 9403310170 किंवा [email protected]
3 सौ.मंजुषा मुळे यांच्याकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे:
मनमंजुषा (आठवणी, जुन्या घटना, व्यक्तीचित्र), इंद्रधनुष्य (संग्रहीत साहित्य), वाचताना वेचलेले (आपल्या वाचनातील उल्लेखनीय उतारे, कविती इ.), चित्रकाव्य.
संपर्कासाठी: व्हाॅटस् अॅप नं. 9822846762 किंवा [email protected]
आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण मराठी ब्लाॅगज् मध्ये वरचा क्रमांक प्राप्त करू शकलो आहोत. अधिक वरचा क्रमांक प्राप्त करणे आपणा सर्वांच्या हातात आहे. शक्यतो सर्वांचे साहित्य समाविष्ट केले जाईल याची काळजी संपादक मंडळ घेत असते. संपादन कार्यात सुसूत्रता यावी म्हणूनच वरीलप्रमाणे विभागणी केली आहे. तरीही काही वेळेला येणा-या अडचणीं लक्षात घेऊन काही सूचना करीत आहोत. त्याचा गांभीर्याने विचार करून पालन व्हावे अशी अपेक्षा आहे.
1) आपली कोणतीही साहित्य कृती वरीलपैकी एकाच संपादक मंडळ सदस्याकडे पाठवावी.एकच साहित्य एकापेक्षा जास्त ठिकाणी पाठवू नये.
2) साहित्य पाठवताना वरील विभागणी लक्षात घ्यावी.
3) एखाद्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन त्या संबंधी साहित्य पाठवले जाते. असे साहित्य एक दोन दिवस आधी आले तर पूर्व नियोजित आराखडा बदलून असे ऐनवेळेस आलेले साहित्य स्विकारणे तांत्रिक कारणांमुळे खूप कठीण असते. त्यामुळे असे साहित्य त्या दिवसाच्या किमान आठ दिवस आधी मिळेल अशा बेताने पाठवावे. त्यामुळे आपण पाठवलेले साहित्य योग्य दिवशी प्रकाशित करता येईल.
4) प्रासंगिक साहित्य (अनपेक्षित सामाजिक/नैसर्गिक घटना, यश इ. विषयी व्यक्त होणे) पाठवतानाही फार विलंब करू नये ही विनंती.
सर्वांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक साहित्य प्रकार योग्य वेळेत लावता येईल.
सर्वांच्या सहकार्याची खात्री आहेच.
धन्यवाद.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈