सौ. सुजाता काळे
((सौ. सुजाता काळे जी मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं । वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं। उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी की मानवीय संवेदनाओं पर आधारित एक भावप्रवण मराठी कविता “चेहरे”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 13 ☆
ओळखीचे वाटतात सगळेच चेहरे
अनोळख्या ठिकाणी जेव्हा मी जातो.
सारखेच भाव चेह-यावर असतात
सपाट शून्य मलूल चेहरा मी पाहतो.
तनावाने त्रस्त काळजीचे काहूर
भविश्याचे प्रश्न चेह-यावर पाहतो.
भूतकाळाचे गाठोडे पाठीवर लादून
ओझ्याने वाकलेला कणा मी पाहतो.
चेह-यात चेहरे नित शोधतो मी
माझाच चेहरा जेव्हा मी पाहतो.