श्रीमती उज्ज्वला केळकर

? १० डिसेंबर –  संपादकीय  ?

आज आचार्य जावडेकर, दिलीप पु.. चित्रे आणि चंद्रकांत खोत या तिन्ही अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या स्वरूपाचा लेखन करणार्यां लेखकांचा स्मृतीदिन.

आचार्य जावडेकर म्हणजेच शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा जन्म २६ सप्टेंबर १८९४ मध्ये झाला. ते मराठी लेखक, तत्त्वचिंतक, बुद्धिवादी विचारवंत होते. ‘आधुनिक भारत’ या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. मराठीतील तत्वज्ञ कादंबरीकार वा. म. जोशी यांनी ‘गीतारहस्य’ नंतरचा थोर ग्रंथ असं ‘आधुनिक भारत’ या ग्रंथाबद्दल म्हंटलं आहे. जावडेकर यांच्यावर आगरकर, टिळक आणि गांधीजी यांचा प्रभाव होता. या द्रष्ट्या लेखकांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामधील देशाला  व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल, असा भाग त्यांनी साक्षेपनेंहाराष्ट्रीय जंनतेसमोर मांडला. ‘बोले तैसा चाले’ याचा आविष्कार त्यांच्या आचारात आणि कृतीत होता. त्यांचे जीवन आणि विचार दोन्हीही आदर्शवत होते. जावडेकरांची साहित्य संपदा – ‘आधुनिक भारत’, लो. टिळक आणि म. गांधी, लोकशाही, हिंदू मुसलमान ऐक्य इ.

याशिवाय आचार्य जावडेकर यांच्यावरहीपुस्तके लिहिली गेली आहेत. प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या ग्रंथालय विभागाने त्यांच्यावर आचार्य शं. द. जावडेकर व्यक्तित्व आणि विचार हे पुस्तक काढले आहे. याशिवाय, शं. द. जावडेकर विचार दर्शन हे नागोराव कुंभार यांनी, गांधींच्या शोधत जावडेकर हे राजेश्वरी देशपांडे यांनी पुस्तक लिहिले आहे.

इस्लामपूरला आचार्य जावडेकर गुरुकुल नावाची शाळा आहे.

☆☆☆☆☆

दिलीप चित्रे हे मराठीतील बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ मध्ये झाला. त्यांनी कविता, कथा, कादंबर्या, समीक्षा लिहिल्या.  त्यांनी इंग्रजीतही लेखन केले. ते चित्रकार आणि शिल्पकारही होते.

दिलीप चित्रे यांच्या प्रकाशित साहित्याबद्दल सांगायचं झालं तर – १. एकूण कविता –   १ ते ४ भाग, कवितेनंतरची कविता, गद्य लेखनात, तिरकस आणि चौकस,  दहा बाय दहा, भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कविता, शिबाराणीच्या शोधत, ओर्फियस पुन्हा तुकाराम (३ आवृत्या)

इ. पुस्तकांची नवे घेता येतील.

अभिरुची, मुंबई दिनांक, रविवार सकाळ, लोकसत्ता इ. मधून त्यांनी स्तंभलेखन केले. ५४ ते ६० च्या दरम्यान त्यांनी शब्द या त्रैमासिकाचे सापडन केले. लघुनियत्कालिकांच्या चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता. तुकारामाच्या अभंगांचा त्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद Says Tuka खूप गाजला. त्यांच्या साहित्याचे जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेत भाषांतरे झाली

दिलीप चित्रे यांना १९९४ मध्ये साहित्य अॅंकॅदमीचे अवॉर्ड एकूण कविता – भाग १ साठी मिळाले. मजेची गोष्ट म्हणजे याच वर्षी त्यांना इंग्रजी भाषेतील पुस्तकासाठीही साहित्य अॅळकॅदमीचे अवॉर्ड मिळाले.त्या पुस्तकाचे नाव Says Tuka.

चित्रपट क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. गोदान चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांचेच. ‘विजेता’ चित्रपटाची कथा पटकथा त्यांचीच होती.

मराठी साहित्य विश्वात दिलीप चित्रे यांनी असे विविध अंगाने काम केले आहे.

☆☆☆☆☆

बिनधास्त चंद्रकांत खोत यांचा जन्म भीमाशंकर इथे ७ सप्टेंबर १९४० साली झाला. त्यांच्या घराची परिस्थिती हलाखीची होती. स्वकष्टाने त्यांनी एम ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना पीएच.डी. ही करायची होती पण गाईड न मिळाल्याने त्यांचे स्वप्न अपूरे राहिले. पण गमतीची गोष्ट आशी की त्यांच्याच गावाच्या तरुणाने त्यांच्या साहित्यावर संशोधन करून प्रबंध लिहिला आणि त्याला पीएच.डी. मिळाली.

साहित्य क्षेत्रात कवी म्हणून त्यांनी पदार्पण केले॰ १९६९ मध्ये प्रकाशित झालेला ‘मर्तिक’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह नंतर ते कादंबरीकडे वळले.१९७० साली त्यांनी पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अव्यय ही कादंबरी लिहिली. त्यानंतर ‘बिनधास्त, नंतर ‘विषयांतर’ या सगळ्या लैंगिक वीषयांवरच्या कादंबर्याल. खोतांनी आपल्या कादंबर्यायतून कामगार वस्तीतीl जीवन, तेथील लैंगिक घुसमट बेधडक मांडली.

‘अबकडई’ या गाजलेल्या दिवाळी अंकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केलय. हा अंकही वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचकप्रिय होता.

एकीकडे त्यांनी बिनधास्त म्हणता येईल, अशी पुस्तके लिहिली, तर दुसरीकडे, अनाथांचा नाथ ( साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक  चरित्र ), अलख निरंजन (नवनाथांच्यावरील पुस्तक),गण गण गणात बोटे (गजाणणा महाराज), दोन डोळे शेजारी ( शारदामाता यांच्या जीवनावर आत्मनिवेदनात्मक  चरित्र ), बिंब प्रतिबिंब ( विवेकानंदांच्या जीवनावर आत्मनिवेदनात्मक  चरित्र ),, संन्याशाची सावली, (विवेकानंदांच्या जीवनावर), हम गया नाही, जिंदा है (रामदासस्वामी ), अशी त्यांनी संतांवर आणि महान विभूतींवरही पूस्तके लिहिली. पण वाचकांना लक्षात राहिले, ते बिनधास्त खोत.

लेखनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘यशोदा’ चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणीही गाजली.

वङ्मायाच्या क्षेत्रात विविध अंगांनी योगदान देणार्या. या तिघाही प्रतिभावंतांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments