श्री सुहास रघुनाथ पंडित
१० फेब्रुवारी – संपादकीय
धुंडीराज गणेश बापट:
दिक्षीत धुंडीराज बापट यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे झाला.त्यांनी प्रामुख्याने वैदिक वाड्मयाचे भाषांतर केले.अग्निहोत्र आणि वेदविद्येचे अध्ययन आणि अध्यापन त्यांच्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत आले आहे.ही परंपरा जतन करण्यासाठी त्यांनी पाचवड येथे स्वाध्याय मंदिर स्थापन केले.तसेच स्वाध्याय हे मासिक काही वर्षे चालू ठेवले.श्री.बापट यांनी वैदिक संशोधन मंडळाच्या श्रौतकोशाचे संपादन केले.
त्यांच्या कडून झालेली ग्रंथ निर्मिती अशी:–
- आर्यांचे संस्कार
- ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणांचे भाषांतर
- कृष्ण यजुर्वेद भाग 1 व भाग 2 तैत्तिरिय संहिता
- गणपतिअथर्वशिर्ष
- वैदिक राष्ट्रधर्म
- शुक्ल यजुर्वेद संहितेचे मराठी भाषांतर.
13 फेब्रुवारी1956 ला त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: महाराष्ट्रनायक, विकीपीडिया.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈