श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

यदुनाथ थत्ते:

पू.साने गुरूजींचा ज्यांचावर प्रभाव होता असे यदुनाथ थत्ते हे साहित्यिक,पत्रकार,संपादक आणि स्वातंत्र्यसेनानी होते.त्यांनी 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.

थत्ते यांची साहित्य संपदा:

बालसाहित्य – आटपाट नगर होते,चिरंतन प्रकाश देणारी ज्योत म.गांधी,रेशमा.

चरित्र – आपला वारसा,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर,साने गुरुजी,

माहितीपर – पुढे व्हा भाग 1ते 3,यशाची वाटचाल

उपदेशपर – समर्थ व्हा,संपन्न व्हा.

व्यक्तीचित्रण – साने गुरूजी जीवन परिचय

संपादित – स्वातंत्र्यगीते

1998 साली वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

निनाद बेडेकर :

निनाद बेडेकर हे इतिहासाचे गाढे अभ्यासक होते.जगभर अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला व अनेक पुरातन,कागद पत्रांचा अभ्यास केला .त्यासाठी त्यांनी अरेबिक,पर्शियन भाषा ही शिकून घेतल्या.यावरून इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास हे त्यांचे  विशेष आवडीचे व अभ्यासाचे विषय होते.शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाची कौशल्ये समजावीत म्हणून त्यांनी एम्.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसमोर इग्लिश मधून व्याख्याने दिली होती.गड किल्ले प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची मोहीम त्यांनी यशस्वीपणे राबवली.राज्य सरकारच्या या संबंधीच्या समितीचे ते प्रमुख मार्गदर्शक होते.

पुण्याच्या स्व-रूप वर्धिनी या संस्थेचा ‘स्वा. विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ त्याना प्राप्त झाला होता. 🙏

☆☆☆☆☆

श्री.बेडेकर यांची ग्रंथसंपदा:

अजरामर उद्गार (ऐतिहासिक), आदिलशाही फर्माने, गजकथा, छ.शिवाजी, झंझावात:मराठ्यांची यशेगाथा, थोरलं राजं सांगून गेलं, विजयदुर्गाचे रहस्य, शिवभूषण, समरांगण, दुर्गकथा, पानिपतचा रणसंग्राम, इतिहास दुर्गांचा, महाराष्ट्रतील दुर्ग  इ.इ.

श्री.बेडेकर यांचे 2015 मध्ये,वयाच्या 66वर्षी निधन झाले.

या इतिहासप्रेमी साहित्यिकाला मानाचा मुजरा ! 🙏

☆☆☆☆☆

नागोराव घनश्याम देशपांडे:

ना.घ.देशपांडे या नावाने प्रसिद्ध असलेले कवी, नागपंचमी चा जन्म म्हणून  नागोराव ! जन्म, शिक्षण, व्यवसाय विदर्भातच. मेहकर येथे त्यांनी सत्र न्यायालयात वकिली केली. तसेच काही वर्षे आकाशवाणीवर सल्लागार म्हणून काम केले. त्यावेळी स्त्री निवेदिका असल्या पाहिजेत कारण त्यांचा स्वर पुरूषांच्या स्वरापेक्षा उंच असतो .हे त्यांनी सरकारला पटवून दिले. तेव्हापासून स्त्री निवेदिकाना आकाशवाणीवर स्थान मिळाले.

1929 साली त्यांनी शीळ ही कविता लिहिली व त्यांचे मित्र गोविंदराव जोशी यांनी ती गायली. ही कविता प्रचंड लोकप्रिय झाली. पुढे 1932मध्ये एच.एम.व्ही.ने त्याची ध्वनीमुद्रिका काढली. तेव्हापासून भावगीताचे युग मराठीत सुरू झाले. शीळ हा कवितासंग्रह 1954मध्ये प्रकाशित झाला.

त्यांच्या अभिसारिका या काव्य संग्रहाला राज्य पुरस्कार मिळाला व खूणगाठी ला  साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. गुंफण हा त्यांच्या सुरूवातीपासूनच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह आहे.

त्यांचे अन्य  साहित्य:

कंचनीचा महालः चार दीर्घकविता

सुगंध उरले, सुगंध उरले

आत्मकथन: फुले आणि काटे

गाजलेली गीत:

अंतरीच्या गूढगर्भी, काळ्या गढीच्या जुन्या, घर दिव्यात मंद तरी, डाव मांडून भांडून, तुझ्याचसाठी कितीदा, नदीकिनारी गं, मन पिसाट माझे अडले रे, रानारानात गेली बाई शीळ

वर उल्लेख केलेल्या  पुरस्काराशिवाय त्यांना गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, साहित्य वाचस्पती उपाधी, विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मेहकर येथे खास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

रानारानातील शीळ कानाकानापर्यंत पोहोचवणारा हा कवी 2000साली वयाच्या 91 वर्षी डाव सोडून गेला. या भावकवीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments