श्रीमती उज्ज्वला केळकर
१२ फेब्रुवारी – संपादकीय
पद्मा गोळे
पद्मा गोळे यांचा जन्म १० जुलै १९१३ चा. तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. त्या मराठी कवयित्री, लेखिका व नाटककार होत्या.
त्यांचा पाहिला कवितासंग्रह प्रीतीपथावर १९४७ साली प्रकाशित झाला. रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव इ. नाटिका त्यांनी लिहिल्या . वाळवंटातील वाट ही त्यांची कादंबरी.
तर आकाशवेडी, श्रावणमेघ, निहार, स्वप्नजा हे त्यांचे कवितासंग्रह.
एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्री मनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत दिसतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी, व्यक्तिमत्वाचा प्रत्यय त्यातून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्ग प्रतिमा, आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितांची लक्षणीय वैशिष्ट्ये.
स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला व रायगडावरील एक रात्र आणि इतर नाटिका या बालनाटिका या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला आहे.
१२ फेब्रुवारी १९९८ ला त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या प्रतिभेला विनम्र श्रद्धांजली
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈