श्रीमती उज्ज्वला केळकर
१५ जानेवारी – संपादकीय
नामदेव ढसाळ:
सुप्रसिद्ध कवी, लेखक, समाजसुधारक, दलित बौद्ध चळवळीचे आणि दलित पॅंथरचे नेते , महानगरीय जीवनावर लिहिणारे, लिहिताना बोली भाषा वापरणारे नामदेव ढसाळ यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील पूर या खेड्यात १५ फेब्रु. १९४९ झाला. घरची हलाखीची स्थिती होती म्हणून ते वडलांबरोबर मुंबईला आले. मुंबईतील ‘गोलपीठा’ या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्टीत राहू लागले. पुढे मोठं झालावर त्यांचा जो पहिला काव्यसंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला तो ‘गोलपीठा’ इथे घेतलेल्या अनुभवावरच.
मूर्ख म्हातार्याने डोंगर हालवला यातील कविता माओवादी विचारसरणीवर आधारलेल्या आहेत., तर प्रियदर्शनी यातील कविता इंदिरा गांधी यांच्यावर आहेत.
१९६० नंतरच्या महत्वाच्या कवींमध्ये नामदेव ढसाळ हे नाव घेतले जाते. त्यांच्या कविता लेखनाची एक वेगळीच शैली आहे. वेगळीच भाषा आहे. वेदना, विद्रोह, नकार हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे.
नामदेव ढसाळांचे कविता संग्रह – १. ‘गोलपीठा’- १९७२ २. आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी – १९७६ , ३. मूर्ख म्हातार्याने डोंगर हालवला- १९७५ , ४. मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे, ५. तुही इयत्ता कंची – १९८१ , ६. – खेळ – १९८३, ७. .या सत्तेत जीव रमत नाही. -१९९५, ८. गांडू बगीचा, ९. निर्वाणाअगोदरची पीडा
नामदेव ढसाळांचे कथा संग्रह – उचल (१९९०) , लगाम (१९९९)
नामदेव ढसाळांच्या कादंबर्या –निगेटीव्ह स्पेस, हाडकी हडवळ , उजेडाची काळी दुनिया
नामदेव ढसाळ नाटक – अंधार यात्रा –
नामदेव ढसाळांचे चिंतांनापर लेखन – १ सर्व काही समष्टीसाठी, २. बुद्धधर्म : काही शेष प्रश्न ३. आंबेडकरी चळवळ ४. आंधळे शतक, ५. दलित पॅंथर- एक संघर्ष
पुरस्कार व सन्मान –
१. ‘गोलपीठा’ महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९७२ , २. सिव्हिएट लँड नेहरू पुरस्कार १९७५-१९७६ , ३.म. राज्य कवी केशवसुत पुरस्कार – १९८३ , ४. बहिणाबाई चौधरी पुरस्कार ५. पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील पुरस्कार ६. साहित्य अकादमी – स्वर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार- २००५ ७. गंगाधर गाडगीळ – २००६, ८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, ९. बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार- इ. स. २००९ , १० . पद्मश्री पुरस्कार १९९९
नामदेव ढसाळांच्या नावे ठेवलेले पुरस्कार – २०१४ सालापासून ‘नामदेव ढसाळ’ शब्द पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार हिन्दी कवी विष्णु खरे यांना मिळाला होता.
२. नामदेव ढसाळ स्मृती समितीच्या वार्षिक कार्यक्रमात एका कवीला गौरवले जाते. २०१६ मधे पहिला पुरस्कार लोकनाथ यशवंत यांना मिळाला होता.
स्मृती गौरव समीती – नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती तेवत ठेवण्याच्या दृष्टीने वैभव छाया व समविचारी मित्रांनी नामदेव ढसाळ स्मृती गौरव समितीची स्थापना केली. या समीतीच्या वतीने दरवर्षी १५ जानेवारीला मुंबईला ‘सारे काही समष्टीसाठी’ हा अभिवादनात्मक कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या वेळी आंबेडकरांच्या, नामदेव ढसाळांच्या कवितांचे वाचन होते. त्यांच्या निवडक कवितांचे नाट्यरूपांतर, गाण्यांचे सादरीकरण, त्यांच्या जीवनावर आणि कवितांवर आधारित चित्र प्रदर्शन , चर्चासत्र, चित्रपट, लघुपट, स्क्रिनिंग अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आज नामदेव ढसाळ यांचा स्मृतीदिन आहे. ( १५ जानेवारी २०१४) आज मुंबईला ‘सारे काही समष्टीसाठी’ हा कार्यक्रम चालू असेल. या बहुरूपी विद्रोही कवीला हार्दिक श्रद्धांजली
☆☆☆☆☆
मंदाकिनी गोगटे:
मंदाकिनी गोगटे या लोकप्रिय कथा आणि कादंबरीकार . त्यांचा जन्म १६मे १९३६ ला मुंबई येथे झाला. त्यांनी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी घेतली. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी कादंबर्या, विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.
मंदाकिनी गोगटे यांच्या कादंबर्या – दीपाली, गार्गी, भैरवी, मोठी वेगळी पाऊलवाट, रसिक बलमा, ह्या कातर उत्तर रात्री
मंदाकिनी गोगटे यांच्या कथा – गंध मातीचा, ढळता दिवस, प्रेमाच्या होड्या, बायकांचा गणित, मुंबईच्या रंगी-बेरंगी मुली , स्वप्नातली परी, सवत माझी लाडकी (या कथेवर चित्रपट झाला आहे.)
प्रवास वर्णन – आमची पण सिंदाबादची सफर , त्या फुलांच्या सुंदर देशात
मंदाकिनी गोगटे यांचे बालसाहित्य – छानदार कथा, भाग १ व२ , जांबो जांबो ग्वाना, प्रेमा पुरब ( क्रांतिकारी अन्नपूर्णा – चरित्र कथा, महम्मद घोरीची सांगली (विज्ञान कथा) , चिमाजी आप्पांची मिशी ( निबंधा माला )
एकांकिका – बोले तैसा चाले
इतर – बागेश्री दिवाळी अंकाचे संपादन, प्रकाशन त्यांनी कित्येक वर्षे केले आज त्यांचा स्मृतीदिन (१५ जानेवारी २०१० ). त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈