श्रीमती उज्ज्वला केळकर
१८ फेब्रुवारी – संपादकीय
अशोक जैन
अशोक जैन यांचा जन्म ११ एप्रिल १९४४ चा. त्यांची पत्रकारिकतेतील कारकीर्द विशेष गाजली. दै.. तरुण भारत ( पुणे), सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, मधून त्यांनी पत्रकारिता केली. त्यांची महाराष्ट्र टाईम्समधली कारकीर्द महत्वाची ठरली. मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर म.टा. चे प्रतिनिधी म्हणून ते दिल्लीला गेले. तिथून त्यांनी ‘राजधानीतून या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. अशोक जैन यांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा आणि खेळकर शैली यामुळे ही वार्तापत्रे गाजली. ८९ साली ते म. टा. चे सहसंपादक झाले. ‘मैफल या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी त्यांनी पेलली. विषय वैविध्य, नाविन्य यामुळे या पुरवणीला प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी ‘कलंदर’ या टोपण’ नावाने ‘कानोकानी’ हे सदर लिहिले. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, संस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्किल टिपणी करणारे हे सदर अतिशय लोकप्रीय झाले व पुढे याचे पुस्तकही निघाले. त्यांनी अनेक चांगल्या इंग्रजी पुस्तकांचे सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत.
अशोक जैन यांचे काही प्रकाशित साहित्य –
अत्तरचे थेंब, कानोकांनी हे लेखसंग्रह, कस्तुरबा ( शलाका तेजाची ), अंतस्थ ( मूळ लेखक पी.व्ही. नरसिंह राव), इंदिरा अंतीम पर्व ( मूळ पुपुल जायकर ), इंदिरा, आणीबाणी आणि भारतातील लोकशाही (अनुवादीत), शेशन ( चरित्र ), डॉक्युमेंट ( कादंबरी – आयर्विंग वॅलेस), फॅन्टॅस्टिक फेलुदा ( मूळ सत्यजित रॉय), लक्ष्मण रेषा (आर. के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र ), व्योमकेश बक्षी , स्वामी व त्याचे दोस्त ( मूळ आर. के. नारायणन.) ही त्यांची महत्वाची पुस्तके.
आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈