श्रीमती उज्ज्वला केळकर
१९ डिसेंबर – संपादकीय
आपटे गुरुजी या नावाने ओळखले जाणारे आणि येवला येथे पहिली राष्ट्रीय शाळा सुरू करणारे गांधीवादी लेखक म्हणजे पांडुरंग श्रीधर आपटे. त्यांचा जन्म ६, ऑक्टोबर रोजीझाला.
त्यांची पुस्तके – १. अलौकिक अभियोग – पशू, पक्षी आणि वनस्पती यांनी मानवनिर्मितीत होणार्या निसर्गर्हासाबद्दलकेलेली तक्रार असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
२. आपल्या पूर्वजांचा शोध – डार्विनच्या सिद्धांतावर हे पुस्तक आधारलेले आहे.
३.कुटुंब रंजन, ४. जवाहरलाल नेहरू, ५. म. गांधी दर्शन ६. लाडला मुलगा, ७. श्रीकृष्णाची आत्मकथा ८.श्री विद्यानंद सरस्वती महाराज व श्री केशव गोविंद महात्म्य ९ सानेगुरूजी ओझरते दर्शन १०. सेनापती बापट ओझरत दर्शन, ११.स्वराज्य मार्गदर्शक लो. टिळक इये. पुस्तके लिहिली.
☆☆☆☆☆
सुरेंद्र बरलिंगे
तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि तत्वचिंतक म्हणून जगभर मान्यता पावलेले लेखक म्हणजे सुरेंद्र शिवदास बारलिंगे. १९३२ ते ४२ च्या काळात ते स्वातंत्र्य सैनिक होते. १९४०च्या सुमाराला हैद्राबादच्या संग्रामातही ते सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २० जुलै १९१९चा. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच डी॰ घेतली. प्रबंध उत्तम झाल्यामुळे त्यांना पुढील संशोधनासाठी त्यांना छात्रवृत्ती मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा वविषय होता, द कन्सेप्ट ऑफ चेंज. त्यांनी मराठी, हिन्दी आणि इंग्रजी आशा तीनही भाषातून तत्वज्ञानपर ग्रंथ लिहिले. त्यांनी पुणे विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, युगोस्लाविया इ. ठिकाणी अध्यापनाचे काम केले. त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा तत्वज्ञान विषयक आहे. व ती तीनही भाषांतून आहे. त्यांनी ३ त्रैमासिकांचे संपादन केले. त्यापैकी, परामर्श ही मराठी व हिंदी त्रैमासिके व इंग्रजीत फिलॉसोफिकल क्वार्टरली हे त्रैमासिक होते. तत्वज्ञाना पुस्तके सोडून त्यांनी मराठीत खालील पुस्तके लिहिली. आकाशाच्या सावल्या, इन्किलाब , खरा हा एकाची धर्म, गोष्टीचे गाठोडे, , माझा देश, माझे घरइये. त्यांचे कथासंग्रह आहेत. ओंजळभर पाणी हे आत्मकथन आहे. पुन्हा भेटू या हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे. मी पण माझे ही कादंबरी आहे.
सुरेंद्र बरलिंगे हे १९८० ते १९८९ साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते.
त्यांच्या देहावसानांनंतर त्यांच्यावर परामर्शने विशेषांक काढला. ‘डॉ. बरलिंगे यांचे तत्वज्ञान आणि ललित लेखन यातून त्यांचे जाणवणारे ‘विचारविश्व’ हा विशेषांकाचा विषय होता.
सुरेंद्र बरलिंगे आणि पांडुरंग श्रीधर आपटे या विद्वानांना त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक प्रणाम.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈