श्रीमती उज्ज्वला केळकर
१९ नोव्हेंबर – संपादकीय
कॅ. गोपाळ गंगाधर लिमये (२५सप्टेंबर१८८१ ते १९ नोहेंबर १९७१ ) हे कथाकार आणि विनोदी लेखक होते. ते व्यवसायाने डॉक्टर. वैद्यकीय परीक्षेत त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. ’इंडियन मेडिकल सर्व्हिस’ साठी त्यांची १९१८ साली कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. ३वर्षे त्यांनी सैन्यात काम केले. १९२२ पासून ते मुंबई महानगर पालिकेत आरोग्याधिकारी होते.
१९१२ मध्ये त्यांची पहिली कथा मासिक मनोरंजन मध्ये प्रकाशित झाली. कथेचा नाव होतं ‘प्रेमाचा खेळ.’ ’बापूंची प्रतिज्ञा’ ही विनोदी दीर्घ कथा पुस्तक रूपात प्रकाशित झाली. वनज्योत्स्ना हेही त्यांच्या दीर्घ कथेचे पुस्तक. तिच्याकरिता, हेलकावे हे त्यांचे कथा संग्रह. कॅ. गो. गं. लिमये यांच्या निवडक कथा हे पुस्तक राम कोलारकर यांनी संपादित करून प्रसिद्ध. केले.
कथेइतकेच मोलाचे कार्य त्यांनी विनोदाच्या क्षेत्रात केले. विनोद सागर, जुना बाजार, गोपाळकाला, तुमच्याकरता विनोदबकावली, इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोदी लेखन लोकप्रिय झाले कारण त्यांचे सूक्ष्म अवलोकन. साध्या साध्या घटनातून त्यांनी विनोद निर्मिती केली. त्यांच्या विनोदात कधीही बोचरा उपहास नसे.
‘सैन्यातील आठवणी’ हे त्यांचे आत्मनिवेदनात्मक पुस्तक. याशिवाय त्यांनी वैद्यक, सुश्रुषा यावरही पुस्तके लिहिली आहेत.
या महान लेखकाला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २.इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈