श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भारताचार्य चिंतामणी  विनायक वैद्य  

चिंतामणी  विनायक वैद्य  यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ मधे झाला. ते विद्वान होते. संस्कृत भाषेचे चांगले जाणकार होते. थोर ज्ञानोपासक होते. रामायण- महाभारताचे संशोधक, मीमांसक, चतुरस्त्र ग्रंथकार होते. माहितीप्रचुर अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागावर त्यांनी प्रकाश टाकला.    

चिं. वि. वैद्य यांनी १८८९ ते १९३४ या काळात मराठी आणि इंग्रजी मिळून एकूण    ५०,००० पृष्ठे इतके लेखन केले. त्यांचे स्फुट लेखन केसरी, विविध ज्ञान विस्तार, इंदुप्रकाश इ. नियतकालिकातून प्रकाशित झाले. त्यांनी एकूण २९ ग्रंथ लिहिले. त्यापैकी २० ग्रंथ मराठीत, तर ९ ग्रंथ इंग्रजीत होते.    

चिं. वि. वैद्य यांचे प्रकाशित साहित्य

१. संक्षिप्त महाभारत , २. संस्कृत वाङ्मायाचा त्रोटक इतिहास ३. संयोगीता ( नाटक ), ४. श्रीकृष्ण चरित्र , ५. रीडल ऑफ रामायण, ६. मानव धर्मासार, ७. मध्ययुगीन भारत     (३ खंड) , ८. दुर्दैवी रंगू ( कादंबरी) ९. अबलोन्नती ( लेखमाला) १०. चिं. वि. वैद्य यांचे ऐतिहासिक निबंध

चिं. वि. वैद्य यांना मिळालेले सन्मान

  • लो. टिळकांनी त्यांचे तर्कशुद्ध, सखोल लेखन, प्रगाढ अभ्यास करून महाभारताची मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून भारताचार्य ही पदवी दिली.
  • १९०८ मध्ये पुणे येथे भरलेल्या ६व्या साहित्य संमेलनाचे (ग्रंथकार संमेलनाचे – त्यावेळी साहित्य संमेलनाला ग्रंथकार संमेलन असा शब्द रूढ होता. ) ते अध्यक्ष होते.
  • भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे ते आधी अजीव सभासद होते. नंतर अध्यक्ष झाले.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते.

☆ ☆ ☆ ☆ ☆

रामनाथ चव्हाण

रामनाथ चव्हाण हे दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते आणि लेखक. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे भटक्या, विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन असं विपुल लेखन त्यांनी केलय. पुणे विद्यापीठाच्या आण्णाभाऊ साठे  अध्यासनाचे ते प्रमुख होते.

‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत हे ५ खंडात प्रकाशित झालेले त्यांचे लेखन महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. ‘जाती व जमाती’ हेही त्यांचे पुस्तक महत्वाचे मानले जाते.

रामनाथ चव्हाण यांची पुस्तके –

१. भटक्या विमुक्तांचे अंतरंग, २. पारध, ३. बिन चेहर्‍याची माणसं ४. गवगाडा : काल आणि आज ५. घाणेरीची फुले , ६. नीळी पहाट, ७. पुन्हा साक्षीपुरम ८. वेदनेच्या वाटेवरून ९. दलितांचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

इ. त्यांची महत्वाची पुस्तके आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कमलाबाई ओगले

कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला. मराठीतील पाककृती संग्रहाच्या या लेखिका, संपादिका. त्यांनी संकलित केलेल्या पाककृतींचा ‘रुचिरा’ हा संग्रह अतिशय लोकप्रीय झाला. एके काळी नववधूला रुखवताबरोबरच हा संग्रहही दिला जाई. (अजूनही दिला जातो.)  हे पुस्तक १९७० साली ‘मेहता’ने प्रकाशित केले. हा संग्रह २ भागात प्रकाशित झालेला आहे. या संग्रहाच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्यात.    

भारताचार्य चिंतामणी  विनायक वैद्य , रामनाथ चव्हाण आणि कमलाबाई ओगले या तिघांचाही आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला प्रणाम . ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments