श्रीमती उज्ज्वला केळकर
२२ ऑक्टोबर – संपादकीय
ना. सि. फडके (१८९४ ते १९७८ )
ना. सि. फडके हे दुसर्या पिढीतील सुप्रसिद्ध लेखक. ह. ना. आपटे यांच्यापासून आधुनिक मराठी कथेला आणि कादंबरीलाही सुरुवात झाली. त्या दृष्टीने ना. सि. फडके हे दुसर्या पिढतील लेखक मानावे लागतील. त्यांच्या कथा- कादंबर्या रेखीव आणि तंतत्रशुद्ध आहेत. भाषा ललित मधुर आहे. आकर्षक सुरुवात, कथेच्या मध्ये गुंताऊंट आणि शेवटी उकल आसा त्यांच्या कादंबरीचा साचा ठरलेला आसे. सुरेख शब्दचित्रण, रेखीव व्यक्तिचित्रण , रचनेतील सफाई, कथेमद्धे एखादे नाजुक रहस्य, विसमयाची हुलकावणी, अशी वाशिष्ट्ये त्यांच्या लेखनाची जाणवतात. ते वी.स.खांडेकर यांचे समकालीन. ते कलावादी होते. तर खांडेकर जीवनवादी. कळसाठी कला असे त्यंचे मत होते, तर जीवनासाठी कला असे खांडेकर म्हणात. दोघांचा वाद अनेक दिवस नियतकालिकातून रंगला होता. होता. दोघेही शेवटपर्यंत आपापल्या भूमिकेवर ठाम होते.
ना. सि. फडके यांच्या अटकेपार, उजाडलं पण सूर्य कुठे? कुलब्याची दांडी, कलंकशोभा इ. ७० कादंबर्याआहेत. कलंकशोभा या कादंबरीवर चित्रपटही निघाला होता. धूम्रवलये, गुजागोष्टी, ही त्यांच्या लघुनिबंधाची पुस्तके. प्रतिभासाधन हे त्यांचे वैचारिक पुस्तकही खूप गाजले. त्यांच्या काही कादंबर्यांचे इंग्रजी व अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले.
रत्नागिरी येथे १९४० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६२मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. दरवर्षी मराठीतील एका साहित्य कृतीला त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येतो.
☆☆☆☆☆
रमा हर्डीकर : रमा हर्डीकर यांचा आज जन्मदिन. या प्रामुख्याने अनुवादासाठी प्रसिद्ध आहेत. आत्मरंगी या रस्कीन बॉंड आत्मचरित्राचा त्यांनी अनुवाद केलाय. ‘काळी मांजर’ हा एडगार अॅलन पो यांच्या गूढकथांचा अनुवाद आहे. खिडकी या लघुत्तम कथांचे ई- बुक निघाले आहे. सुंदर पिची, गुगलचे भविष्य, हे जगमोहन भानवर यांच्या उस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांनी प्रामुख्याने रस्कीन बॉंड आणि जगमोहन भानवर यांच्या पुस्तकांचे अनुवाद केलेले दिसतात. माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केले आहेत.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “. २) गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈