श्रीमती उज्ज्वला केळकर
२५ डिसेंबर – संपादकीय
आज नाताळ म्हणजेच ख्रिसमस. आज येशू ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला म्हणून ख्रिस्ती बांधवांचा आज सण. आपल्याकडे गुढी पाडव्याला गुढ्या उभारणे जसे आवश्यक आणि महत्वाचे मानले जाते, तसेच ख्रिसमसला ख्रिसमस ट्री उभारणे ख्रिस्ती बांधव महत्वाचे मानात. हा ट्री सूचिपर्णी वृक्षाचा असून तो स्वर्गातील ईडन गार्डन बागेचा व येशूच्या क्रूसाचा प्रतीक आहे. आपण दिवाळीला फरळाचे पदार्थ करतो, त्याप्रमाणेच महाराष्ट्रातले ख्रिस्ती बांधव फराळाचे पदार्थ करून एकमेकांना देतात. एकमेकांना भेटी व शुभेच्छा देतात. लहान मुलांना खाऊ आणि खेळणी सांताक्लॉज देतो, असे मानले जाते.
आज मलाही सांताक्लॉज भेटावा आणि त्याने मला विचारावं, बोल, तुला काय देऊ? आणि मी म्हणावं, ‘मला ‘ओमीक्रॉनवरची लस दे. औषध दे.
?️आज नाताळच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा ?️
मराठी साहित्यातील महान आणि मान्यताप्राप्त लेखक म्हणजे श्री. म. माटे यांचा जन्म विदर्भातील शिरपूर इथे २प्टेंबर १८८६ साली झाला. प्रथम शाळेत आणि नंतर महाविद्यालयात, इंग्रजी व मराठी विषयाचे त्यांनी अध्यापन केले. ’रोहिणी’ मासिकाचे ते पहिले संपादक होते. ‘ केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्राचे सांवत्सरीक ( ३ खंड ) या ग्रंथाचे संपादन करून साहीत्य क्षेत्रात त्यांनी मनाचे स्थान मिळवले. ’विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकाला त्यांनी २०० पानी प्रस्तावना लिहिली. ती खूप गाजली. वाचकांना विज्ञानयुगाकडे बघण्याचा दृष्टीकोण त्यातून दिला. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता निवारणाचे काम केले. माटे यांचे लेखन प्रासादिक, प्रसन्न, आणि शैलीदार होते. ते शिक्षक होते. कृतीशील सुधारक. होते आणि नितळ-निर्व्याज माणूसही होते. १९३० ते १९५५ या काळात त्यांनी लेखन केले. , संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्वचिंतनात्मक, इतिहास मंथन, चालू घडामोडी, निबंध, ललित, असा मोठा विस्तृत पट त्यांच्या लेखनाला आहे. पश्चिमेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी. याशिवाय त्यांचे प्रकाशित साहित्य सांगायचे झाले तर— अनामिक, अस्पृश्यांचा प्रश्न, उपेक्षितांचे अंतरंग, गीतातत्व विमर्श, मी व मला दिसलेले जग, निवडक श्री. म. माटे , भावनांचे पाझर, रसवंतीची जन्मकथा, (भाषेच्या विकासाबद्दलचे पुस्तक), विचार मंथन, विचारा शलाका, संत, पंत आणि तंत (संत, पंत आणि तंत यांच्या काव्याचा परामर्श घेणारे पुस्तक) त्यांचे ‘उपेक्षितांचे अंतरंग’ हे पुस्तक खूप गाजले. ‘कृष्णाकाठचा रामवंशी’, तारखोर्यातील पिर्या’, ‘मांगवाड्यातील रुमाजीबोवा’, ‘बन्सिधरा आता तू कुठे जाशील?’ या कथा खूप गाजल्या.
अस्पृश्य निवारक मंडळाचे ते संस्थापक होते. अस्पृश्य वस्तीत जाऊन ते मुलांना शिकवत. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १९४५ साली कल्याण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. सांगली येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते विचाराने हिंदुवादी होते.
श्री. म. माटे यांचा आज स्मृतीदिन ( २५ डिसेंबर १९५७) त्यानिमित्ता त्यांना विनम्र आदरांजली. ?
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈