सुश्री मंजुषा सुनीत मुळे
२६ डिसेंबर – संपादकीय
आज २६ डिसेंबर हा मराठी गीतकार श्री. दत्ता वि. केसकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या गीतांबद्दल, किंवा इतर साहित्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध झाली नसली, तरी त्यांची ध्वनिमुद्रित झालेली जी दोनच भावगीते, रसिकांच्या मनात कायमची नोंदली गेलेली आहेत, त्याबद्दल सांगायलाच हवे.
“घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे “, हे त्यातले एक भावगीत, आणि “ प्रतिमा उरी धरोनी , मी प्रीती गीत गाते “ –हे दुसरे भावगीत. लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या या दोन्ही भावमधुर गीतांनी मराठी भावगीत-विश्वात कायमचे स्थान मिळवलेले आहे.
श्री. द. वि. केसकर यांना आदरपूर्वक नमस्कार.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
माहितीस्रोत :- इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈