सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ जुलै -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
शरद्चंद्र पुराणिक ( इ.स. १९३३९ – २७ जुलै २०१६ )
शरद्चंद्र पुराणिक यांनी संस्कृत विषयात बी.ए., एम. ए. केलं. पुढे इंग्रजी विषय घेऊनही एम. ए. केलं आणि महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग इ. ठिकाणी नोकरी करून ते शेवटी चाळीसगावला स्थिरावले. त्यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकातील संवाद व स्वागते ते तोंडपाठ म्हणून दाखवत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
शरद्चंद्र पुराणिक यांना वाचनाची आणि लेखनाचीही प्रचंड आवड होती. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झालीत. ८ पुस्तके लिहून तयार आहेत पण ती अद्याप प्रकाशित व्हायची आहेत.
शरद्चंद्र पुराणिक यांची पुस्तके –
इतिहास क्षेत्राशी निगडीत अशी त्यांची बरीच पुस्तके आहेत. उदा. १.पहिला बाजीराव- पूर्वार्ध, उत्तरार्ध, २.मराठ्यांचे स्वातंत्र्य समर- छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम , ३. ऋषितर्पण , ४.मराठी इतिहासाच्या अभ्यासकांचे व्यक्तिदर्शन- इ. ८च्या वर त्यांची पुस्तके आहेत. रियासतकार सरदेसाई, राजवाडे, विष्णुशास्त्री , श्री. म. माटे इ. व्यक्ती आणि त्यांचे कार्य सांगणारीही त्यांची पुस्तके आहेत.
पुरस्कार
त्यांच्या ‘रामदास’ या पुस्तकाला पुणे नगर वाचन मंदिरचा तर, ‘तुळाजी आंग्रे’ या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पुरस्कार मिळाला आहे. २०१० साली महाराष्ट साहित्य परिषदेच्या १०४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना ‘मृत्युंजय’ पुरस्कार देण्यात आला.
शरद्चंद्र पुराणिक यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈