श्रीमती उज्ज्वला केळकर
३१ डिसेंबर – संपादकीय
.
गत वर्षाच्या
सरत्या क्षणांबरोबरच
विरून जाऊ दे
गूढ, उदास, मलिन धुके
कटु स्मृतींचे
येऊ दे सांगाती
सौरभ सुमधुर स्मृतींचा
जो सेतू होऊन राहील
भूत-भविष्याचा
आज २०२१ सालचा शेवटचा दिवस. वर्षभराचा मागोवा घेताना, अनेक बर्या वाईट आठवणी उसळून वर येताहेत. भविष्य काळात शांती मिळवायची असेल, तर दु:खद आठवणी विसरायला शिकायला हवं आणि सुखद आठवणी आठवता आठवता त्या जगन्नियंत्याचे आभार मानायला हवे, की त्याने असे सुखद, सुंदर क्षण आपल्या ओंजळीत टाकले.
माझ्या सुखद क्षणांबद्दल बोलायचं झालं, तर , ई-अभिव्यक्तीच्या संपादनाच्या निमित्ताने अनेक लिहिते हात माझ्या परिचयाचे झाले. लिहित्या हातांच्या धन्यांची ओळख झाली. हा अल्प परिचय अधीक दृढ होईल, मैत्रीत रूपांतरित होईल, अशी उमेद बाळगून नवं वर्षात पाऊल टाकायचे आहे. ई-अभिव्यक्तीवरून अधिकाधिक सकस साहित्य कसं देता येईल, याचा शोध, वाचक-लेखकांच्या सहाय्याने घ्यायचा आहे. सर्वांच्या सहाय्याने अधिकाधिक लेखक-वाचक मंडळी ई-अभिव्यक्तीशी जोडून घ्यायचीत. हे झाले, तर याचे श्रेयही आपणा सर्वांचे आहे. नवीन वर्षातला संकल्पच म्हणा ना हा! आणि असे घडावे, म्हणून मीच मला बेस्ट लक देते आहे.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈