श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
आत्माराम नीळकंठ उर्फ आनंद साधले.
महाभारत या ग्रंथाला अनुसरून अनेक भाषांमध्ये अनेक लेखकांनी लेखन केले आहे. पण युधिष्ठीर अर्थात धर्मराजाला खलनायक बनवण्याचे धाडस केले ते आनंद साधले यांनी. ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ या आपल्या कादंबरीतील त्यांनी युधिष्ठीराला खलनायक बनवल्यामुळे त्यांच्यावर सुरूवातीला भरपूर टीका झाली. पण नंतर त्यांचे रोखठोक विश्लेषण लोकांना पटू लागले व या कादंबरीने लोकप्रियता मिळवली. रोखठोक, स्पष्ट, मुद्देसूद मांडणी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. ‘आनंदध्वजाच्या कथा’ या पुस्तकातही त्यांनी धीट भाषेत, शृंगाररससंपूर्ण लेखन केले आहे. ‘मातीची चूल’ हे त्यांचे आत्मचरित्र देखील यामुळेच गाजले. याशिवाय त्यांनी गीतगोविंद, दहा उपनिषदे दोन भाग, महाराष्ट्र रामायण ही पुस्तके लिहीली आहेत. तसेच रुक्मिणी स्वयंवर हे नाटक व लहान मुलांसाठी इसापनीती व हितोपदेश यांचे लेखन केले आहे.
चार एप्रिल 1996 ला वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.त्यांनी सुमारे साठ पुस्तकांचे लेखन केले आहे.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन! 🙏🏻
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈