श्री सुहास रघुनाथ पंडित
५ जानेवारी – संपादकीय
दत्तात्रय गणेश गोडसे :
श्री.द.ग.गोडसे यांचा जन्म जळगावचा.पण त्यांचे शिक्षण नागपूर व मुंबई येथे झाले.तसेच लंडन विद्यापीठाचे ललितकला विषयीचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले होते.
इतिहासकार,नाटककार,चित्रकार,नेपथ्यकार ,कलासमीक्षक अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्यांनी कार्य केले आहे. शिवाजी, रामदास, मस्तानी चित्रकला, शिल्पकला, बुद्धकालीन स्थापत्य, हे त्यांच्या लेखनाचे विषय होते. वृत्तपत्रात वाद संवाद हे त्यांचे सदर खूप गाजले. यात साहित्यिक व सांस्कृतिक घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी ई. वृत्ती प्रवृत्तीवर खुमासदार लिहिले जायचे.
भारताचा सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार असा त्यांचा भारत सरकारने गौरव केला होता.
त्यांची काही पुस्तके व साहित्य : उर्जायन,काही कवडसे,गतिमानी,दफ्तानी,पोत,सोंग,मस्तानी,मातावळ,लोकधाटी,शक्तिसौष्ठव,संभाजीचे भूत, इ. काळगंगेच्या काठी(नाटक) नांगी असलेले फुलपाखरू हे कलावंतांचा सत्कार करणारे पुस्तक.
‘भारलेल्या जगातून आलेला अलौकिक माणूस’ हा दीनानाथ दलाल यांच्या वरील लेख खूप गाजला होता.
आज त्यांचा स्मृतीदिन आहे.
☆☆☆☆☆
नारायण धोंडोपंत ताम्हनकर :
ना.धों.ताम्हनकर या नावाने सुपरिचित असलेले व ‘ गोट्या’ या लोकप्रिय पात्राचे जनक.
त्यांचे बालपण इचलकरंजीत गेले.लहान वयातच त्यानी इचलकरंजी संस्थानिकांकडे कारकून म्हणून नोकरी धरली.तेथे ब्रह्मर्षि नावाची नाटिका लिहीली व सादर केली.त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजीच्या घोरपडे संस्थानिकानी त्यांच्या हातात सोन्याचे कडे घातले.
नंतर ते किर्लोस्करवाडीला गेले.तेथे किर्लोस्कर या मासिकाचे उपसंपादक या पदावर बरेच वर्षे काम केले.तेथून निवृत्त झाल्यावर नाशिकच्या ‘गावकरी’ मध्ये त्यांनी लेखन सुरू केले.
त्यांची साहित्य संपदा : मणि,अविक्षित,दाजी,अंकुश,मालगाडी,शामराई,बहिणभाऊ,किशोरांसाठी गोट्या,चिंगी, नीलांगी,नारोमहादेव,रत्नाकर,खडकावरला अंकुर.
काव्य: तिची कहाणी.
गोट्या या पुस्तकावर आधारित दूरदर्शन मालिका सादर झाली होती व ती लोकप्रियही झाली होती.
आज ना.धों. चा स्मृतीदिन आहे.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈