सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ५ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
रॉय किणीकर म्हणजेच रघुनाथ रामचंद्र किणीकर॰ यांनी मराठीत कविता नाटके, एकांकिका, कथा, कादंबरी, बालसाहित्य लिहिले. साहित्याचे अनुवादही केले. ते पत्रकार होते. त्यांचा जन्म १९०७ सालचा. त्यांचे बरेचसे वास्तव्य कर्नाटकातील गुलबुर्गा इथे झाले. पुढचा काही काळ ते पुणे, औरंगाबाद इथे राहिले.
औरंगाबादहून प्रसिद्ध होणार्या दै. अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे ते संपादक होते. रविवार पुरवणीत ते ललित लेखन करत. रात्र आणि उत्तररात्र हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले. शैलीबद्ध रुबाया ही त्यांची खासियत होती.
त्यांनी काही नाटकातूनही कामे केली होती. ‘ये गं ये गं विठाबाई हे त्यांचे नाटक गाजले. ते सहाय्यक नाट्यदिग्दर्शकही होते.
रॉय किणीकर यांचे प्रकाशित साहित्य –
नाटके – किती रंगला खेळ, खजिन्याची विहीर, ये गं ये गं विठाबाई
एकांकिका – मंगळसूत्र, देव्हारा, साऊंड ट्रॅक
कादंबरी – कोणार्क
कथा – आंधळे रंग, पांगळ्या रेषा
निबंध – शिल्पायन
अनुवादित – इथे जगण्याची सक्ती आहे, एकदा अशीच रात्र येते, दर्यावर्दी कोलंबस
रॉय किणीकर यांच्या ‘ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे ६३ सालचे नाट्यलेखनासाठीचे परितोषिक मिळाले.
रॉय किणीकर माणूस आणि साहित्य हे त्यांच्यावरील पुस्तक, त्यांचे चिरंजीव अनिल किणीकर यांनी लिहिले.
आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला प्रणाम.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈