सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) …
संस्कृतपंडित व लेखक श्री. बाळशास्त्री हुपरीकर यांचा आज स्मृतिदिन . ( मृत्यू दि. ७/८/१९२४.)
हे कोल्हापूर महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. त्याचबरोबर, वेदान्तशास्त्राचे, तसेच, ज्ञानदेव आणि शंकराचार्य यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक आणि भाष्यकार अशीही त्यांची ओळख होती.
त्यांनी लिहिलेले विविध ग्रंथ पुढीलप्रमाणे —–
१) श्री अनुभवामृत पर्यबोधिनी टीका.
२) ( हर्बर्ट स्पेन्सरसाहेबांची ) अज्ञेय मीमांसा व आर्य वेदांत.
३) ग्रंथमाला.
४) श्रीमद्भगवद्गीता अथवा ज्ञानयोग शास्त्र. —- हा ग्रंथ करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी गौरवलेला होता.
५) विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या दृष्टीने वेदातील मतांचे तात्पर्य.
श्री. हुपरीकर यांच्याविषयी आणखी एक महत्वाचे सांगायचे ते असे की, लो. टिळक यांनी लिहिलेल्या “ गीतारहस्य “ या गाजलेल्या ग्रंथावर त्यावेळच्या ज्या काही मान्यवरांनी जाहीरपणे टीकात्मक ( जरा कडवट ) भाष्य केले होते, त्यामध्ये श्री. हुपरीकर यांचाही समावेश होता.
श्री. बाळशास्त्री हुपरीकर यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈