सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भीमराव गस्ती (इ.स. १९५० – ८ ऑगस्ट २०१७.)

भीमराव गस्ती यांचा जन्म यमनापूर – बेळगाव इथे झाला. देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते साहित्यिक होते, त्याचप्रमाणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेही होते. बेरड समाजाच्या व्यथा-वेदना आणि त्यांच्या होणार्याम छ्ळाचे चित्रण त्यांनी आपल्या ‘बेरड’ या आत्मचरित्रात केले आहे. या आत्मचरित्राने साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली.

भीमराव गस्ती यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण यमनापूर इथे झालं. पुढे एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर रशियाची राजधानी मास्कोयेथील पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेट संपादन केली. हैद्राबादयेथील रिसर्च अॅंीड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमधे त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली.

एकदा एका दरोड्यासंदर्भात पोलिसांनी बेरड समाजाच्या २० निरपराध लोकांना अटक केली व त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाविरुद्ध गस्तींनी  न्यायालयात झुंज दिली. मोर्चे काढले. आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी निपाणी येथे देवदासींच्या  १८० मुलींसाठी  वसतिगृह सुरू केले. तिथे देवदासींच्या मुली शिकून शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झाल्या. सामाजिक प्रबोधनाची चळवळ त्यांनी सुरू केली. शेकडो देवदासींचे विवाह लावून दिले. बेरड, रामोशी समाजाच्या विकासासाठी यमनापूर येथे ‘उत्थान’ ही संस्था सुरू केली. भटके, विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष होते.    

भीमराव गस्ती यांची पुस्तके

१. *बेरड (आत्मचरित्र), 2. आक्रोश, 3. सांजवारा

*या पुस्तकाला  महाराष्ट्र राजी पुरस्कारासह आणखी ७ पुरस्कार मिळाले आहेत. 

भीमराव गस्ती यांना मिळालेले काही पुरस्कार, सन्मान

१ अरुण लिमये पुरस्कार

२ कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार

३ गोदावरी गौरव पुरस्कार

४ पंचगंगा सहकारी साखर कारखाना पुरस्कार

५ मुंबाई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी. मर्ढेकर पुरस्कार

६ रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार

९व्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने, साहित्य सेवा आणि समाजसेवेच्या त्यांच्या कार्याला प्रणाम. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुमति क्षेत्रमाडे

सुमति क्षेत्रमाडे या विख्यात कादंबरीकार. त्यांनी अनेक कादंबर्यास व कथा लिहिल्या. त्या अतिशय लोकप्रियही झाल्या. त्यांच्या काही कादंबर्यांावर चित्रपट निघाले. महाश्वेता कादंबरीवर त्याच नावाची टी.व्ही. मालिका झाली, तर ‘युगंधरा’ कादंबरीवर ‘माझिया माहेरा’ ही मालिका झाली.    

त्यांचा जन्म ७ मार्च १९१३चा. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईमधे घेतले. नंतर यातील उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. वैद्यकीय व्यवसाय त्यांनी कोल्हापूरला केला. त्यांची पहिली कादंबरी ‘आधार’ ही दवाखान्याती वातावरणावर आधारित आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच गुजराती भाषेतही विपुल लेखन केले आहे.

सुमति क्षेत्रमाडे यांची विशेष गाजलेली कादंबरी म्हणजे ‘युगंधरा’. यात स्त्रीची अनेक रूपे दाखवली आहेत. त्यांनी सुरूवातीला छंद म्हणून लिहायला सुरुवात केली पण छंद जोपासताना विपुल साहित्यनिर्मिती झाली. मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण, अचूक ज्ञान  आणि संवेदनाशील मन या गोष्टी त्यांच्या कादंबर्यासतून दिसून येतात. त्या शाळेत असल्यापासून लेखन करत होत्या. प्रेम हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. तत्कालीन राजस्त्रिया आणि आणि अन्य स्त्रिया यांना समाजात, कुटुंबात मिळणारी दुय्यम वागणूक यावर त्यांनी प्रभावीपणे लेखन केले आहे.

सुमति क्षेत्रमाडे यांच्या काही कादंबर्याा –

पांचाली, नाल-दमयंती, मखमली बटवा, चतुरा, अग्नीदिव्य, बाभळीचे काटे, पुनर्जन्म , बंदिनी सत्यप्रिय गांधारी, याज्ञसेनी इ. ४८ कादंबर्याम त्यांनी लिहिल्या.

सुमति क्षेत्रमाडे यांचे ८२ व्या वर्षी ८ ऑगस्ट १९९८ मधे निधन झाले.

 आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments