श्री सुहास रघुनाथ पंडित
८ जानेवारी – संपादकीय
नारायण भिकाजी तथा नानासाहेब परूळेकर:
महाराष्ट्रातील एक प्रमुख दैनिक सकाळ चे संस्थापक संपादक ना.भि.परूळेकर यांचा आज स्मृतीदिन.
अमेरिकेतील आपले शिक्षण संपवून नानासाहेब 1929 मध्ये भारतात परत आले.अमेरिकेत असताना त्यांनी फ्रेंच,जर्मन व अमेरिकन वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केले.हे अनुभव घेत असतानाच भारतात परतल्यावर वृत्तपत्र काढण्याचा विचार त्यांच्या मनात पक्का होत होता.इथे आल्यावर त्यांनी त्यावेळच्या मराठी दैनिकांचा अभ्यास केला. व्यावसायिकता सांभाळून समाजाभिमुख वृत्तपत्र काढण्याचा त्यांचा विचार पक्का झाला आणि 1 जानेवारी 1932 ला ‘ सकाळ’ या दैनिकाचा पहिला अंक निघाला. त्यानंतर 1936 मध्ये त्यांनी ‘स्वराज्य’ हे दैनिक सुरू केले. नंतर त्याचे साप्ताहिकात रूपांतर झाले. तेज नावाचे कमी किंमतीचे मासिकही सुरू केले. कालांतराने स्वराज्य व तेज बंद होऊन फक्त सकाळ चालू ठेवले.
चालक,मालक,संपादक,व्यवस्थापक अशा सर्व भूमिका बजावून व्यावसायिकता सांभाळून त्यांनी अखेरपर्यंत दैनिक सकाळ यशस्वीपणे चालू ठेवले.
‘निरोप घेता’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या कारकिर्दीचे चित्र मांडणारे आहे.
आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पत्रकारितेला सलाम.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈