☆ 27 सप्टेंबर- संपादकीय ☆
स्व कविता महाजन
(5 सितंबर 1967 – 27 सितंबर 2018)
आज स्व कविता महाजन यांचाही स्मृतिदिन. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर१९६७ला नांदेड इथे झाला. त्यांची लेखणी कविता, कथा, कादंबरी, लेख, बालसाहित्य, अनुवाद – लेखन आणि
संपादन अशा विविध क्षेत्रात फिरली. लेख – ग्रॅफिटी वॉल, कविता – धुळीचा आवाज, कादंबरी ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, बालकथा जोहानाचे रंग, वारली लोकगीतांचा संग्रह इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सवेदनाशील आणि व्यवस्थेविरुद्ध लढणारी लेखिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या ब्र, भिन्न, कुहू या कादंबर्या खूप गाजल्या. ‘ब्र’चा हिन्दी, ‘भिन्न,’ चा कानडी ‘कुहू’ चा इंग्रजी मधे अनुवाद झाला. ‘रजई’या इस्मत चुगताई च्या कथासग्रहाच्या अनुवादाला साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला, त्याचप्रमाणे त्यांच्या साहित्याला न.ची. केळकर, काकासाहेब गाडगीळ, ना. ह.आपटे, यशवंतराव चव्हाण इ. अनेक पुरस्कारही मिळाले.
प्रस्तुती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता
चित्र साभार – कविता महाजन – विकिपीडिया (wikipedia.org)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈